सगळ्यांना तुरुंगात टाकलं तरी आम्ही घाबरणार नाही. आम्ही मराठे आहोत, कधीच डगमगत नाही, असं आव्हान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला दिलं आहे. भुजबळांपाठोपाठ अजित पवार आणि सुनील तटकरे तुरुंगात जातील, असं विधान भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केली होतं. त्यानंतर 'दिव्य मराठी' या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सुळे यांनी ही भावना व्यक्ती केली. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "किरीट सोमय्या टीका करतात आणि प्रसारमाध्यमं त्यांची वक्तव्य उचलून धरतात. पण टीका करणारी व्यक्तीही भारदस्त असायला हवी. आम्ही प्रसारमाध्यमांशी सुसंवाद ठेवतो याचा अर्थ त्यांनी आम्हाला 'पप्पू' समजू नये. महाराष्ट्रातील जनतेला राष्ट्रवादी काँग्रेसबाबत प्रचंड आदर आहे." ...
भाजयुमोत काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या गणेश पांडेवर दोन दिवसानंतरही गुन्हा दाखल करण्यास भाजपची टाळाटाळ सुरु आहे. त्यामुळे एरवी नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपनं गणेश पांडेला पाठिशी घालावं हे दुर्दैव असल्याची बोचरी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. इतकंच नव्हे तर आमच्या पक्षात पांडे असता तर त्याचं आम्ही काय केलं असतं याचा तुम्ही विचारही करु शकत नाही, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी भाजपला खडे बोल सुनावलेत. त्या आज पुण्यात बोलत होत्या. दुसरीकडे शिवसेनेनंही गणेश पांडेची हकालपट्टी पुरेशी नसल्याचं म्हणत भाजपवर शरसंधान साधलं. इतकंच नव्हे तर याआधीही पांडेनं इतर महिलांशी असंच वर्तन केल्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळं पांडेवर तातडीनं पोली...
पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची इत्यंभूत माहिती 28 खासदारांनी देण्यात येणार आहे. या 28 जणांमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा समावेश आहे. परराष्ट्र सचिव आणि डीजीएमओ दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या सर्जिकल स्ट्राइकबद्दल परराष्ट्र मंत्रालयाच्या संसदीय समितीला माहिती देतील. काँग्रेसचे दिग्गज नेते शशी थरुर यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत राहुल गांधी, वरुण गांधी, सुप्रिया सुळे यांच्यासह 28 खासदारांचा समावेश आहे. लोकसभा सचिवालयाच्या माहितीनुसार परराष्ट्र मंत्रालयाच्या संसदीय समितीची मंगळवारी बैठक होईल. या बैठकीत परराष्ट्र सचिव, संरक्षण सचिव आणि लष्करी कारवाईचे महासं...
आधार कार्डच्या आधारे ओळख पटवण्यात वृद्ध शेतकरी, ज्येष्ठ नागरिकांना ज्या अडचणी सहन कराव्या लागत आहेत, त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दिल्लीत अर्थमंत्री अरुण जेटलींची भेट घेतली. ज्येष्ठ नागरिक, वृद्ध शेतकरी यांना पेन्शन काढताना, रेशन खरेदी करताना आधार व्हेरिफिकेशन होत नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे. शेतात वर्षानुवर्षे काम केल्यामुळे अनेकदा वृद्ध शेतकऱ्यांच्या हातावरच्या रेषा झडतात. या बोटांचे ठसे मशीनवर व्यवस्थित घेता येत नाहीत. त्यामुळे मुळात या व्यक्तींना आधार कार्ड बनवण्यातच अडचणी येतात. सध्या मोबाईल सिम कार्डशीही आधार लिंक करण्याचा सरकारचा आदेश आहे. शिवाय पगार, पेन्शन काढताना इतर सरकारी सबसिडी मिळवतानाही...
डीएमकेच्या माजी खासदार कनिमोळी यांची 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आनंद व्यक्त केला. सुप्रिया सुळेंनी ट्वीट करुन, मैत्रीण निर्दोष सुटल्याचे सांगत न्याय मिळाल्याची भावना बोलून दाखवली.2G स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणी एकूण तीन खटले सुरु आहेत. त्यापैकी दोन सीबीआयकडे आणि एक अंमलबजावणी संचलनालयाकडे आहे. त्यापैकी ए. राजा यांच्याशी संबंधित खटल्यात सीबीआय कोर्टाने सर्व 17 आरोपींना निर्दोष मुक्त केले. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री ए. राजा, डीएमकेच्या माजी खासदार कनिमोळी यांचाही समावेश आहे.“माझी मैत्रीण कन्नीसाठी मला खूप आनंद झालाय. अखेर न्याय मिळाला.”, अशा शब्दात भावना व्यक्त करत सुप्रिया सु...
सर्वपक्षीय आणि सामाजिक धुरिणांनी संविधान बचाव सत्याग्रह आंदोलन पुकारलं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर हा लाँग मार्च निघणार असून शरद पवार, राजू शेट्टी, सीताराम येचुरी, हार्दिक पटेल यासारखे नेते सहभागी होणार आहेत. 26 जानेवारीला मुंबईत मंत्रालयाजवळच्या आंबेडकर पुतळ्यापासून गेट वेवरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत हा लाँग मार्च काढण्यात येणार आहे. शेतकरी नेते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या कल्पनेतून हा संविधान बचाव मार्च निघणार आहे. खासदार राजू शेट्टी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जदयूचे माजी नेते शरद यादव, महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी, माकपचे नेते सीताराम येचुरी, गुजरातमधील पाटीदार नेता हार्दिक पटेल, ...
स्त्री शिक्षणासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच भारतरत्न द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली.संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी सुप्रिया सुळेंनी ही मागणी केली. Mahatma Jyotiba Phule and Savitribai Phule were the pioneers of Girl child education. Requested the government to bestow them posthumously 'Bharat Ratna' in the Parliament under Rule 377. — Supriya Sule (@supriya_sule) 5 March 2018“महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे स्त्री शिक्षणाचे प्रणेते होते. त्यामुळे त्यांना मरणोत्तर भ...
महिला शिक्षणासाठी आयुष्य खर्ची घालणारे महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई या महिला शिक्षणाच्या प्रणेत्या होत्या. त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं, अशी मागणी संसदेत केल्याची माहिती सुळे यांनी ट्विटद्वारे दिली.संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला सोमवारपासून सुरूवात झाली. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं अशी मागणी पहिल्याच दिवशी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. मह...
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतीबा फुले यांना भारतरत्न जाहिर करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत केली आहे.फुले दांम्पत्याने आपले संपुर्ण आयुष्य समाजाच्या उत्थानासाठी खर्ची घातले.दलित, शोषित,स्त्री,शेतकरी यांच्या भल्यासाठी ते शेवटपर्यंत झुंजले.आजच्या एकसंध समाजासाठी त्यांनी केलेल्या कार्यास सलाम करण्यासाठी,त्यांना भारतरत्न जाहीर व्हावा यासाठी पक्षभेद विसरून एकत्र येण्याची गरज आहे असं देखील त्या म्हणाल्या आहेत .महात्मा फुले हे एकोणिसाव्या शतकातील महान सुधारक होते. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांनी अभूतपूर्व लढा दिला. तर देशात स्त्री शिक्षणाचा पाया रचण्यात सावित्रीबाई फुले यांचा ...
PRS legislative research, a Delhi based non-profit, used multiple parameters to judge the performance of MPs like attendance, participation in debates, raising of questions and introducing a private member’s bill. While Bharatiya Janata Party (BJP) supported Member of Parliament (MP) in Rajya Sabha, Sanjay Kakade, has been the lowest performer as far as attendence, debate and raising questions in the RS is concerned while BJP’s Amar Sable has excelled in his performance on these parameters. Updated: Mar 16, 2018 11:25 ISTShrinivas Deshpande - Hindustan Times, Pune With a year left for Lok Sabha polls, various Members of Parliament (MPs) from...
रेल्वे परीक्षा गोंधळाविरोधात विद्यार्थी रेल्वे रुळावर उतरले मुंबई | Updated: March 20, 2018 10:01 AMदादर- मांटुगादरम्यान विद्यार्थ्यांनी रेल रोको केल्याने मध्य रेल्वेची वाहतूक मंगळवारी ऐन गर्दीच्या वेळी विस्कळीत झाली. रेल्वे परीक्षा गोंधळाविरोधात विद्यार्थी रेल्वे रुळावर उतरले आहेत. पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना रेल्वे रुळावरुन हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडून रुळावरुन हटण्यास नकार दिला.अप्रेंटीस प्रशिक्षणार्थ्यांना रेल्वेत नोकरी मिळालीच पाहिजे, अशी मागणी करत शेकडो विद्यार्थी मंगळवारी सकाळी दादर- माटुंगादरम्यान रेल्वे रुळावर उतरले. गेल्या तीन ते चार वर्षांपासून आम्ही रेल्वेकडे पाठपुरावा करत आहोत. पण आम्हाला न...
सकाळी 7 वाजल्यापासून अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी मध्य रेल्वे मार्गावर ठिय्या मांडून, रेल्वे वाहतूक ठप्प केली होती. ती वाहतूक सकाळी पावणे अकराच्या सुमारास सुरु करण्यात आली. प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई |Last Updated: 20 Mar 2018 11:00 AM मुंबई: तब्बल साडेतीन तास मुंबईकरांची नाकेबंदी केल्यानंतर, अॅप्रेंटिसच्या उमेदवारांनी आपला रेल रोको मागे घेतला आहे. प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर अॅप्रेंटिसच्या उमेदवारांनी आंदोलन मागे घेतलं.सकाळी 7 वाजल्यापासून अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी मध्य रेल्वे मार्गावर ठिय्या मांडून, रेल्वे वाहतूक ठप्प केली होती. ती वाहतूक सकाळी पावणे अकराच्या सुमारास सुरु करण्यात आली.सकाळी सात वाजल्यापासून सुरु असलेलं ...
खासदार सुप्रिया सुळे यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारपुणे, दि. ३० (प्रतिनिधी) – दिल्ली येथील फेम इंडिया संस्थेच्या वतीने देण्यात येनारा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार यंदा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे याना आज प्रदान करण्यात आला. आज (दि. ३०) सकाळी साडेदहा वाजता दिल्ली येथील विज्ञान भवनच्या सभागृहात केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत सुळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, कोळसा आणि खाण राज्यमंत्री हरीभाई चौधरी, माजी खासदार जनार्दन द्विवेदी, ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण डॉ. बिंदेश्वर पाठक यांच्यासह कार्तिकेय शर्मा, राजीव मिश्रा, ‘फेम’चे प्रमुख संदीप मारवाह आणि उमाशंकर ...
संसदेत बारामतीचा आवाज लोकसभेत 95 टक्के उपस्थिती, कामकाजात 90 टक्के सामाजिक सहभागबारामती : प्रतिनिधीदिल्ली येथील फेम इंडिया संस्थेच्यावतीने देण्यात येणारा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार यंदा बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रे सच्या खासदार सुप्रिया सुळे यांना प्रदान करण्यात आला. यामुळे यंदाही संसदेत बारामतीचा आवाज घुमच्याचे दिसते.शनिवारी (दि. 30) सकाळी साडेदहा वाजता दिल्लीतील विज्ञान भवनाच्या सभागृहात केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत खा.सुळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, कोळसा आणि खाण राज्यमंत्री हरीभाई चौधरी, माजी खासदार जनार्दन द्विवेदी, ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण ...
प्रभात वृत्तसेवा - सुप्रिया सुळे यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारMarch 31, 2018 | 9:29 amबारामती -दिल्ली येथील फेम इंडिया संस्थेच्या वतीने देण्यात येणारा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार यंदा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना आज प्रदान करण्यात आला. शुक्रवारी (दि. 30) दिल्ली येथील विज्ञान भवनच्या सभागृहात केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत सुळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, कोळसा आणि खाण राज्यमंत्री हरीभाई चौधरी, माजी खासदार जनार्दन द्विवेदी, ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण डॉ. बिंदेश्वर पाठक यांच्यासह कार्तिकेय शर्मा, राजीव मिश्रा, फेमचे प्रमुख संदीप मारवाह आणि उमा...
सुप्रिया सुळे http://news.supriyasule.net/wp-content/uploads/2018/03/sakal-1.jpgराष्ट्रीयीकृत बँका सातत्याने विविध शुल्कांच्या नावाखाली खातेदारांकडून मोठ्या प्रमाणावर वसुली करीत आहेत. पण रिझर्व्ह बँक असो की सरकार, कोणतीच यंत्रणा ग्राहकांच्या नाराजीची दखल घेत नाही. राष्ट्रीयीकृत बँका ग्राहकांसाठी सर्वाधिक सुरक्षित मानल्या जात होत्या. परंतु, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या व्यवहारांबाबत शंका निर्माण होत आहेत. विशेषतः काही मोठ्या उद्योगपतींनी राष्ट्रीयीकृत बँकांची मोठी देणी थकविल्याचे उघड झाल्यानंतर हा विषय अधिक गंभीर झाला. या व्यावसायिकांना मोठी कर्जे देताना बँकांनीच नियम पायदळी तुडविल्याचे समोर येत आहे. मोठ्या कर्जबुडव्यांकडून होणाऱ्यानुकसा...
पुरंदर_विमानतळ_दिल्ली_बैठक पुरंदर येथील विमानतळाबाबत आज दिल्ली येथे नागरी विमान वाहतूक मंत्रालयात झालेल्या बैठकीस सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. विमातळासाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा. तसेच तेथील पाणी आणि अन्य अडचणी तातडीने सोडवून लवकरात लवकर काम मार्गी लावण्याच्या सुचना सुळे यांनी केल्या.
सकाळ न्यूज नेटवर्क 02.57 AM बाबा-बुवांच्या राज्यमंत्री दर्जाविरोधात आवाज नाहीमुंबई - मध्य प्रदेशमध्ये बाबा-बुवांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला जातो. तरीही त्या विरोधात समाजातून आवाज उठत नाही, अशी खंत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी व्यक्त केली. फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सामाजिक बहिष्काराविरोधी कायद्याची माहिती शाळा - महाविद्यालयांत पोचवण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी या वेळी व्यक्त केले.अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे झालेल्या सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याचे स्वागत व अंमलबजावणी परिषदेत त्या बोलत होत्या. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, आमदार नीलम गोऱ्हे आदी...
Sandip Kapde Updated Wednesday, 11 April 2018 - 3:22 PMपुणे: “दहावीच्या पुस्तकात राजकीय पक्षांचा उल्लेख केला आहे. हे महाराष्ट्रात प्रथमच घडतेय. शिक्षणात राजकारण कधीच आले नव्हते. मुलांना चुकीचे शिकवू नका! आठ दिवसात ही पुस्तके बदलली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू”. असा इशारा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी हल्लाबोल यात्रेदरम्यान बोलतांना केला दिला.महाराष्ट्र राज्य मंडळाच्या दहावीच्या नव्या पुस्तकात सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेचे गोडवे गायले आहेत. त्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काहीदवसांपूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दादरच्या शिवाजी मंदिरात दहावीच्या नव्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचं प्रकाशन केलं. तसेच दहावीच्या नव्या अभ्यासक्र...
फुले दांपत्यास भारतरत्न मिळावा संसदेतील मागणीचा सुप्रिया सुळे यांच्याकडून पुनरुच्चारपुणे, दि. ११ (प्रतिनिधी) – क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात यावे, या मागणीचा पुनरुच्चार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केला.महात्मा जोतिबा फुले यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त फुले याना अभिवादन केल्यानंतर त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, समाजातील पददलित आणि गोरगरीब वर्गासाठी आणि त्याहून मोठे कार्य म्हणजे स्त्री शिक्षणासाठी फुले दांपत्याने केलेले कार्य लाख मोलाचे आहे. या दोघांचेच हे श्रेय आहे, की आज देशातील महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात उभ्या आहेत.अश...