इतक्या कमी वेळात हरकती, सूचना कशा मांडायच्या? खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल पुणे, दि. २८ (प्रतिनिधी) – बारामती आणि इंदापूर ही दोन मोठी शहरं. त्यापैकी बारामती तालुक्यातील पाच गावे आणि इंदापूर तालुक्यातील 22 गावे याचा अर्थ एकूण 26 ठिकाणच्या शेतकरी आणि नागरिकांची जमीन पालखी मार्गाच्या रुंदीकरणासाठी संपादित करण्यात येणार आहे. त्यासाठी स्थानिक जमीन मालकांना हरकती आणि सूचना मांडण्यासाठी सरकारने दिलेली मुदत अत्यंत कमी असून नागरिकांचा गोंधळ उडू शकतो, अशी भावना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.इंदापूर आणि बारामती या दोन तालुक्यांच्या हद्दीतून राष्ट्र संत तुकाराम महाराजाची पालखी जाते. हा मूळ रस्ता सहा पदरी होणार...
खासदार सुप्रिया सुळे यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारपुणे, दि. ३० (प्रतिनिधी) – दिल्ली येथील फेम इंडिया संस्थेच्या वतीने देण्यात येनारा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार यंदा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे याना आज प्रदान करण्यात आला. आज (दि. ३०) सकाळी साडेदहा वाजता दिल्ली येथील विज्ञान भवनच्या सभागृहात केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत सुळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, कोळसा आणि खाण राज्यमंत्री हरीभाई चौधरी, माजी खासदार जनार्दन द्विवेदी, ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण डॉ. बिंदेश्वर पाठक यांच्यासह कार्तिकेय शर्मा, राजीव मिश्रा, ‘फेम’चे प्रमुख संदीप मारवाह आणि उमाशंकर ...
प्रभात वृत्तसेवा - सुप्रिया सुळे यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारMarch 31, 2018 | 9:29 amबारामती -दिल्ली येथील फेम इंडिया संस्थेच्या वतीने देण्यात येणारा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार यंदा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना आज प्रदान करण्यात आला. शुक्रवारी (दि. 30) दिल्ली येथील विज्ञान भवनच्या सभागृहात केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत सुळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, कोळसा आणि खाण राज्यमंत्री हरीभाई चौधरी, माजी खासदार जनार्दन द्विवेदी, ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण डॉ. बिंदेश्वर पाठक यांच्यासह कार्तिकेय शर्मा, राजीव मिश्रा, फेमचे प्रमुख संदीप मारवाह आणि उमा...
Friday, 30 Mar, 8.18 pmपुणे - राज्य शासनाने पालखी मार्ग रूंदीकरणाकरिताच्या भूसंपादनासाठीचा अद्यादेश दि. 9 मार्चला काढला. परंतु, हरकती व सुचनांसाठीची निविदा मंगळवारी (दि. 27) प्रकाशित करण्यात आली. यामध्ये हरकती व सुचनांकरिता 21 दिवसांचा अवधी दिल्याचे नमुद असले तरी प्रत्यक्षात ही मुदत गुरूवारी (दि. 29) संपल्याने बारामती आणि इंदापुरातील महसूलसह शासकीय कार्यालयात हरकती मांडण्याकरिता आलेल्या शेतकऱ्यांचा मोठा गोंधळ उडाला. केवळ दोनच दिवसांत हरकती व सुचना कशा द्यायच्या तसेच याची सुनावणी दोन दिवसांत कशी होणार? असा घोर जीवाला लागलेल्या शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून याबाबत 26 गावांतील शेतकऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे निवेदन दिले आहे.पुण...
सुप्रिया सुळे http://news.supriyasule.net/wp-content/uploads/2018/03/sakal-1.jpgराष्ट्रीयीकृत बँका सातत्याने विविध शुल्कांच्या नावाखाली खातेदारांकडून मोठ्या प्रमाणावर वसुली करीत आहेत. पण रिझर्व्ह बँक असो की सरकार, कोणतीच यंत्रणा ग्राहकांच्या नाराजीची दखल घेत नाही. राष्ट्रीयीकृत बँका ग्राहकांसाठी सर्वाधिक सुरक्षित मानल्या जात होत्या. परंतु, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या व्यवहारांबाबत शंका निर्माण होत आहेत. विशेषतः काही मोठ्या उद्योगपतींनी राष्ट्रीयीकृत बँकांची मोठी देणी थकविल्याचे उघड झाल्यानंतर हा विषय अधिक गंभीर झाला. या व्यावसायिकांना मोठी कर्जे देताना बँकांनीच नियम पायदळी तुडविल्याचे समोर येत आहे. मोठ्या कर्जबुडव्यांकडून होणाऱ्यानुकसा...
शिरूर येथील हल्लाबोल आंदोलनात बोलताना सुप्रिया सुळे पुणे, दि. २० (प्रतिनिधी) – केवळ महाराष्ट्रच नाही, तर संपूर्ण देशभरात जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न उभे राहतात, तेव्हा पवार साहेबच धावून येतात. डिजिटल इंडियाची गरज आहेच; पण केवळ त्याने पोट भरत नाही ते काम फक्त शेतकरीच करू शकतो, असा घणाघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.शिरूर येथे झालेल्या हल्लाबोल सभेत त्या बोलत होत्या. पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि अन्य नेते तसेच शिरूर तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते याप्रसंगी उपस्थित होते.राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड मो...
Sandip Kapde Updated Wednesday, 11 April 2018 - 3:22 PMपुणे: “दहावीच्या पुस्तकात राजकीय पक्षांचा उल्लेख केला आहे. हे महाराष्ट्रात प्रथमच घडतेय. शिक्षणात राजकारण कधीच आले नव्हते. मुलांना चुकीचे शिकवू नका! आठ दिवसात ही पुस्तके बदलली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू”. असा इशारा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी हल्लाबोल यात्रेदरम्यान बोलतांना केला दिला.महाराष्ट्र राज्य मंडळाच्या दहावीच्या नव्या पुस्तकात सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेचे गोडवे गायले आहेत. त्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काहीदवसांपूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दादरच्या शिवाजी मंदिरात दहावीच्या नव्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचं प्रकाशन केलं. तसेच दहावीच्या नव्या अभ्यासक्र...
Supriya Sule also announces that Ajit Pawar would lead NCP party in Maharashtra Supriya Sule during NCP’s Halla Bol rally at Waraje in Pune asked party workers to work hard to see Ajit Pawar as the next chief minister of Maharashtra apart from hitting out at the chief minister for controversial textbook content. (HT PHOTO ) Supriya Sule during NCP’s Halla Bol rally at Waraje in Pune asked party workers to work hard to see Ajit Pawar as the next chief minister of Maharashtra apart from hitting out at the chief minister for controversial textbook content. (HT PHOTO Yogesh Joshi :Hindustan Times, Pune Updated: Apr 12, 2018 15:13 ISTThe issue of ...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची डागडुजी कधी पुणे : सासवड - जेजुरी रस्त्यावरील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर दुभाजकांची दुरावस्था झाली आहे. या मार्गाची डागडुजी कधी करणार ? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर खात्यावर अपघाताचे काही फोटो शेअर करत मुख्यमंत्र्यांना हा सवाल विचारला आहे. या मार्गावर सतत अपघात होत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे, नागरिकांचे जीव धोक्यात आहेत, त्यामुळे लवकरात लवकर या मार्गाची डागडुजी झाली पाहिजे असेही त्या म्हटल्या आहेत. या मार्गाशी अनेक भक्तांच्या, भाविकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत....
May 25, 2018 टीम थोडक्यात पुणे, महाराष्ट्र 0 वाढत्या महिला अत्याचारांना मुख्यमंत्री जबाबदार पुणे | महाराष्ट्रात महिला अत्याचार वाढत असतील तर ज्यांच्याकडे गृहखातं आहे ते राज्याचे मुख्यमंत्री काय करतात? असा प्रश्न राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलाय. त्या बारामती दौऱ्यावर असताना बोलत होत्या. राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत आहे. सरकारच्या क्राईम रिपोर्टनुसार महिला अत्याचार गुन्ह्यात महाराष्ट्राचा देशात वरचा क्रमांक लागतो, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, महाराष्ट्र पोलिस आणि मुंबई पोलिसांचा आम्हाला सार्थ आभिमान आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मिलिंद संगई ; 04.52 PM या सरकारचे चाललेय तरी काय?बारामती (पुणे): महागाईने कहर केला आहे, सामान्य माणसाचे जीवन जगणे कठीण बनले आहे, लोकांच्या मनात कमालीची खदखद आहे, तरीही सरकार काहीही करायला तयार नाही...या सरकारचे चालले आहे तरी काय? असा संतप्त सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला. आज (शुक्रवार) पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा सवाल उपस्थित केला.बेरोजगारी वाढली, परकीय गुंतवणूक येत नाही, नवीन नोक-यांची निर्मिती होत नाही, शेतीमालाला हमी भाव मिळत नाही, दूध, साखरेला भाव नाही, शिक्षणाच्या बाबतीत रोज नवीन काहीतरी निर्णय होत आहेत, जे काही सरकारकडून सुरु आहे, ते फारस चांगल चाललेल नाही, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडल.समाजामध्ये आज ...
मिलिंद संगई : शुक्रवार, 25 मे 2018 दोन्ही काॅग्रेसची आघाडी लवकर व्हावी होण्यासाठी प्रयत्नशीलबारामती शहर : राज्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी लवकरात लवकर व्हावी असा माझा स्वताःचा वैयक्तिक प्रयत्न असल्याची स्पष्ट भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी आज बोलून दाखविली. बारामतीतील पोस्ट कार्यालयातील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी त्या बोलत होत्या. ही आघाडी जितकी लवकर होईल तितके मतभेद संपविण्यासह एखादे पाऊल पुढे मागे करायलाही वेळ मिळू शकतो, त्यामुळे ही आघाडी व कार्यकर्त्यांचे मनोमीलन यासाठी वेळ जाऊ नये. दोन्ही पक्षांना थोडे कमी जास्त करावे लागेल पण आघाडी व्हावी असे आपल्याला मनापासून वाटते. चांगली राजकीय आघाडी झाली आणि मतांचे विभाजन झाले नाही तर खूप च...
May 25, 2018 / By Reporter Center of Excellence for Dairy foundation stone laid in BaramatiBaramati – Netherlands Deputy Prime Minister Ms Carola Schouten on Friday laid the foundation stone of Center of Excellence for Dairy, a joint Indo – Dutch initiative between the Agricultural Development Trust, Baramati (supported by GOI under RKVY) and the Dutch Govt.Genetic improvement of Indian breeds for better cattle health, increased milk yield and milk quality improvement will be the focus areas of CoE for Dairy.“I had gotten opportunity to visit Netherlands during my stint as an Agriculture Minister. There I decided to set up the Center of Excel...
मिलिंद संगई ; शुक्रवार, 25 मे 2018 राष्ट्रवादी काॅग्रेस सोडणे हा निरंजन डावखरेंचा असंस्कृतपणाबारामती शहर : ज्या पक्षाने सगळ देऊनही शेवटच्या मिनिटाला पक्ष सोडणे हे दुर्देवी आहे, याला असंस्कृतपणा म्हणतात, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, अशा शब्दांत निरंजन डावखरेंच्या भाजप प्रवेशाविषयी खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रीया दिली.बारामती शहर : ज्या पक्षाने सगळ देऊनही शेवटच्या मिनिटाला पक्ष सोडणे हे दुर्देवी आहे, याला असंस्कृतपणा म्हणतात, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, अशा शब्दांत निरंजन डावखरेंच्या भाजप प्रवेशाविषयी खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रीया दिली.डावखरेंची ही कृती असंस्कृतपणाची असल्याचे सांगत नीतीमत्तेच्या गप्पा मारणा-या पंतप्रधान नरेंद...
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नेदरलंडच्या उपपंतप्रधानांसोबत बारामतीत सायकलवरुन रपेट मारली नेदरलंडच्या उपपंतप्रधानांसोबत सुप्रिया सुळेंची सायकलस्वारीराहुल ढवळे, एबीपी माझा, बारामती | Last Updated: 25 May 2018 11:30 PMबारामती : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नेदरलंडच्या उपपंतप्रधानांसोबत बारामतीत सायकलवरुन रपेट मारली. सुप्रिया सुळेंना सायकल चालवताना पाहून उपस्थित विद्यार्थिनीही भारावल्या.बारामतीमध्ये काही स्वयंसेविका आणि विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आलं. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि नेदरलँडच्या उपपंतप्रधान कॅरोला स्काऊटेन उपस्थित होत्या. दोघींच्या हस्ते हे सायकल वाटप करण्यात आलं.यावेळी सुप्रिया सुळे आणि स्काऊटे...
संतोष आटोळे : 09.32 AM Supriya Sule Appreciates Water Conservationशिर्सुफळ : बारामती तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जलसंधारणांची कामे झाले आहेत. यासाठी प्रशासनासह विविध खाजगी कंपन्यांचा सहभाग कौतुकास्पद आहे. या कामांमुळे उन्हाळ्यात भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या कायमची सुटेल असा विश्वास बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.बारामती मधील गाडीखेल येथे सकाळ रिलीफ फंड, अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट व मगरपट्टा सिटी यांच्या माध्यमातुन ओढा खोलीकरण करण्यात आले. या ठिकाणी पियाजिओ व्हेईकल्स कंपनीच्या सीएसआर निधीतुन बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्यामध्ये साठलेल्या पाण्याचे पुजन, गुणवंत विद्यार्थी सत्कार, व गावभेट दौऱ्यानिमित्त आ...
संतोष आटोळे : शुक्रवार, 6 जुलै 2018 Baramati Model Of Development Is Famous In The Countryशिर्सुफळ : घरोघरी गॅस ही संकल्पना केंद्र व राज्य सरकार आता राबवित आहे. पण गेल्या अनेक वर्षांपासून बारामती तालुक्यातील बहुतांशी भागात हा विकास यापूर्वीच पोचला आहे. यामुळेच विकासाचे बारामती मॉडेल देशात प्रसिद्ध आहे, असे प्रतिपादन बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.कटफळ (ता.बारामती) या मतदारसंघातील गावांमध्ये गावभेट दौऱ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुळे बोलत होत्या. यावेळी बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, उपसभापती शारदा खराडे, पंचायत समिती सदस्य लिलाबाई गावडे, तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष संभा...
मिलिंद संगई : शनिवार, 11 ऑगस्ट 2018 Hearing Aid Distribution Program In Baramatiबारामती - कोणत्या गोष्टीचा संबंध नेमका कशाशी असेल याची पुसटशीही कल्पना अनेकदा आपल्याला नसते, मात्र या छोट्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत केले तर अनेक प्रश्न चुटकीसरशी दूर होतात ही बाब खासदार सुप्रिया सुळे यांच्या श्रवणयंत्र वाटप कार्यक्रमातून गेल्या चार वर्षात सिध्द झाली आहे.ज्येष्ठ नागरिक वयोमानापरत्वे कानाने नीट ऐकू शकत नाहीत. ऐकूच येत नाही म्हटल की कुटुंब आणि समाजही अशा व्यक्तीकडे दुर्लक्ष करु लागतात, त्या व्यक्तीचा इतरांशी संवाद खुंटल्याप्रमाणे होतो आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मन व शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो. अनेकदा या छोट्याशा गोष्टीमुळे कौटुंबिक कलह वाढतात आण...
मिलिंद संगई : 09.37 AM सुप्रियाताई ठरल्या देवदूतबारामती शहर - नशीबाची दोरी बळकट असेल तर अनेकदा काही व्यक्ती देवदूतासारख्या धावून येत जीवदान देतात. असाच काहीसा प्रत्यय इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील पाटील कुटुंबियांना आला. खासदार सुप्रिया सुळे या वेळेस एखाद्या देवदूताप्रमाणे मदतीला धावून आल्या आणि पाटील कुटुंबियातील अवघ्या दोन महिन्यांचा अथर्व अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून परत आला.अथर्वचा जन्म झाल्यानंतर त्याच्या शरीरात अशुध्द रक्ताचा पुरवठा होत असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. हृदयात गुंतागुंत निर्माण झाल्याने त्याचा जीव वाचविण्यासाठी त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रीया करणे गरजेचे होते. इतक्या छोट्या बाळावर शस्त्रक्रीया करणे जोखमीचे काम...
मिलिंद संगई : मंगळवार, 4 सप्टेंबर 2018 बारामती शहर : येथील बारामती फलटण रेल्वे मार्गाबाबत एकत्र बसून चर्चा करुन मार्ग काढण्याचा निश्चित प्रयत्न करु.....आणि समजा अडचण आलीच तर तुम्ही सहा आठ महिने थांबा....एकदा लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक झाली की मी बघतो कस काम होत नाही ते....त्या मुळे याला फार काही वेळ लागणार नाही....असे सांगत ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आगामी निवडणुकीनंतर नेमके काय चित्र असेल याचेच सूतोवाच केले. बारामती दौंड रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाच्या 56 कोटी रुपयाच्या कामाचे भूमीपुजन आज शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. पवार यां...