मिलिंद संगई ; शुक्रवार, 25 मे 2018
राष्ट्रवादी काॅग्रेस सोडणे हा निरंजन डावखरेंचा असंस्कृतपणा
बारामती शहर : ज्या पक्षाने सगळ देऊनही शेवटच्या मिनिटाला पक्ष सोडणे हे दुर्देवी आहे, याला असंस्कृतपणा म्हणतात, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, अशा शब्दांत निरंजन डावखरेंच्या भाजप प्रवेशाविषयी खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रीया दिली.
बारामती शहर : ज्या पक्षाने सगळ देऊनही शेवटच्या मिनिटाला पक्ष सोडणे हे दुर्देवी आहे, याला असंस्कृतपणा म्हणतात, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, अशा शब्दांत निरंजन डावखरेंच्या भाजप प्रवेशाविषयी खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रीया दिली.
डावखरेंची ही कृती असंस्कृतपणाची असल्याचे सांगत नीतीमत्तेच्या गप्पा मारणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही सुळे यांनी निशाणा साधला. ``नरेंद्र मोदी प्रस्थापितांच्या विरोधात लढतात, मला मोदी आणि फडणवीस यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की निरंजन डावखरे हे प्रस्थापित आहेत की नाहीत, भाजपच्या ब-या वाईट काळात जे कार्यकर्ते भाजपमध्ये राहिले त्यांना डावलून दुस-या पक्षातून प्रस्थापिताला आयात करुन त्यांनी पद दिले, म्हणजे या दोघांची नीतीमत्ता काय आहे? निरंजन डावखरे हा प्रस्थापितांचा मुलगा नाही काय, मग भाजपने नेमके काय केले? भाषणात एक बोलायच आणि कृती दुसरीच करायची,`` अशी टीका त्यांनी केली.
राष्ट्रावादी काॅग्रेस पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार का, या प्रश्नावर त्या म्हणाल्या, ``पक्षात प्रवेश दिला जाईल पण त्यांना लगेच पद मिळणार नाही. त्यांना रांगेत उभे राहावे लागेल.``
महागाईने कहर केला आहे, सामान्य माणसाचे जीवन जगणे कठीण बनले आहे, लोकांच्या मनात कमालीची खदखद आहे तरीही सरकार काहीही करायला तयार नाही, अशी टीका त्यांनी केली.
http://www.sarkarnama.in/nirnjan-dawkhare-shows-uncultured-beheviour-24184