खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनावर चिंता व्यक्त केली आहे. हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असतानाही राज्याच्या हिताच्या चर्चांवर भर दिला जात नसल्याचे त्यांनी म्हटले. संसदेचे दिवस कमी होत चालले असून गोंधळ, आरोप-प्रत्यारोपातच वेळ वाया जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. महिला सुरक्षा, हवामानातील बदल, प्रदूषण, राज्याची आर...

