धनंजय... लोकसभेचा विचार करताय काय ? - सुप्रिया सुळे

राजेभाऊ मोगल03.28 PMऔरंगाबाद - धनंजय... तुमचे हिंदीतले अतिशय सुंदर भाषण आज प्रथमच ऐकले, लोकसभेचा विचार करताय का काय ? असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर मंगळवारी (ता.09) चांगलीच गुगली टाकली. मुंडे यांनीही या गुगलीने गोंधळून न जाता स्माईल दिली. औरंगाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित संविधान बचाव परिषदेत बोलतांना विधान परिषद विरोधी पक्षनेते यांच्या भाषणात हिंदीतील काही वाक्य आणि काही हिंदी शेरचा उल्लेख होता. त्यांच्या नंतर भाषणाला उठलेल्या सुप्रिया सुळे यांनी सुरुवातीलाच धनंजय मुंडे यांच्याकडे पाहत आज तुमचे हिंदीतील भाषण प्रथमच ऐकले, खूप छान हिंदी बोलता, कोणी...

Read More
  0 Hits

मुख्यमंत्र्यांचा `पायगुण' जळगावकरांना अंधार देणारा ठरला : सुप्रिया सुळे

योगेश महाजन, बुधवार, 10 ऑक्टोबर 2018अमळनेर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगावला आले, वीज बंद करून गेले अन् जळगावकरांच्या वाट्याला भारनियमन देवून गेले. आपण अधंश्रध्दा मानत नाही, परंतु मराठीतून एखाद्याच्या येण्यावर आणि त्याच वेळी काही घडण्यावर `पायगुण' असा शब्द वापरला जातो. जळगावकरांसाठी मुख्यंमत्र्यांचा हा `पायगुण' अंधार देणारा ठरला, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी केली आहे. अमळनेर येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, की सरकारच्या कोळशाच्या चुकीच्या धोरणामुळे विजेचे भारनियमन होत आहे. हे सरकार बेजबाबदार आहे. कुठल्याही गोष्टीचे नियोजन नाही. भाजप सरकारने 24 तास वीजपुरवठा करण्याचे आश्‍वासन दिले...

Read More
  0 Hits

जैन समाजाचे सामाजिक क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय : खा. सुप्रिया सुळे

प्रशांत चवरेबुधवार, 17 ऑक्टोबर 2018भिगवण : जैन समाजाच्या वतीने समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार पुढाकार घेतला जातो ही आनंदाची बाब आहे. पाणी टंचाई दुर, शैक्षणिक प्रश्न सोडविण्यामध्ये भारतीय जैन संघटनांसारख्या संघटना महत्वपुर्ण भुमिका बजावत आहेत. जैन समाजाचे सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील योगदान निश्चित उल्लेखनीय आहे असे मत बारामती लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे येथील जैन स्थानकांमध्ये सुरु असलेल्या चातुर्मास कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. यावेळी जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, डि.एन. जगताप, शंकरराव गायकवाड, जयदीप जाधव, धनाजी...

Read More
  1 Hits

महाराष्ट्राचा 'लाडका' मुख्यमंत्री एकही शब्द कां काढत नाही?

सरकारनामा ब्युरोशनिवार, 15 सप्टेंबर 2018 मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहमंत्रीपद आहे. त्यांचा एक आमदार मुलींचे अपहरण करुन उचलून नेण्याची भाषा करतात त्यावेळी महाराष्ट्राच्या लाडक्‍या मुख्यमंत्र्यांनी एक शब्दही काढला नाही. हे या सरकारचं अपयश आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.  सुळे यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने मुलींच्या शिक्षणाबाबत, सुरक्षिततेबाबत बोलत असतात मग त्यांच्याच सरकारमध्ये अशा घटना का घडत आहेत. त्याबाबत मोदी मौन बाळगून का आहेत? हरियाणातील सुशिक्षित घरातील मुलगी शिक्षणासाठी आली होती. तिच्यावर आज सामुहिक बलात्कार होतो त्याचा आपण सगळयांनी जाहीर निषेध केला पाहिजे. महारा...

Read More
  0 Hits

सुप्रिया सुळेंचा खड्ड्याबरोबर सेल्फी, मुख्यमंत्र्यांना विचारला जाब

मिलिंद संगई10.39 AMबारामती शहर -  रस्त्यांवरील खडड्यांसोबत सेल्फी काढून सरकारला वारंवार जाणीव करुन दिली, तरी खड्डे बुजविले जात नाहीत. या खड्डयांमुळे जर कोणाचा बळी गेला तर त्याची जबाबदारी राज्य शासनावर असेल असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधत चंद्रकांत पाटील यांच्याऐवजी आता त्यांनी मुख्यमंत्र्यांनाच खड्डयाबाबत जाब विचारला आहे. बोपदेव घाटातील खड्ड्यांचे फोटो फेसबुकवर टाकत त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना टॅग करुन हा इशारा दिला आहे. सेल्फी विथ खड्डा या मोहिमेअंतर्गत वर्षभरापूर्वी सरकारला रस्त्यावरील खड्डयांची जाणीव करुन दिली होती. त्या नंतर माध्यमांच्या साक्षीने पुन्हा महिन्याभरापूर्वी पुन्हा एकदा ...

Read More
  2 Hits

खड्यात जर कोणाचा बळी गेला तर त्याची जबाबदारी सरकारची, सुप्रिया सुळेंचा इशारा

सरकारनामा ब्युरोमंगळवार, 18 सप्टेंबर 2018 बारामती : रस्त्यांवरील खडड्यांसोबत सेल्फी काढून सरकारला वारंवार जाणीव करुन देऊनही खड्डे बुजविले जात नाहीत, या खड्डयांमुळे जर कोणाचा बळी गेला तर त्याची जबाबदारी राज्य शासनावर असेल असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.  थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधत चंद्रकांत पाटील यांच्याऐवजी आता त्यांनी मुख्यमंत्र्यांनाच खड्डयाबाबत जाब विचारला आहे. बोपदेव घाटातील खड्ड्यांचे फोटो फेसबुकवर टाकत त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना टॅग करुन हा इशारा दिला आहे. सेल्फी विथ खड्डा या मोहिमेअंतर्गत वर्षभरापूर्वी सरकारला रस्त्यावरील खड्डयांची जाणीव करुन दिली होती. त्या नंतर माध्यमांच्या साक्षीने पुन्हा महिन्याभरापूर...

Read More
  2 Hits