[9TV SATARA]अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला न्याय मिळू दे - सुप्रिया सुळे
देशात महागाई वाढली, महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या, तरुणांना रोजगार नाही. या सर्व बाबींवर उपाय योजना करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. काल महिला आरक्षणाचे विधेयक संसदेत मंजूर होत होते. त्यावेळी खासदार कनीमोळी यांच्याविरोधात भाजपाच्या एका खासदाराने अपशब्द वापरले. ही बाब निषेधार्थ असून एका बाजूला महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर होत आहे, तर दुसर्या बाजूला महिला खासदाराचा अपमान करण्याचे पाप भाजपा नेत्याने केले. यातून भाजपाची मानसिकता दिसून येते. त्यामुळे हे गणराया भाजपा नेत्यांना सुबुद्धी दे, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली.