1 minute reading time (104 words)

[ABP MAJHA]बापावर बोलायचं नाही, दादांना इशारा

बापावर बोलायचं नाही, दादांना इशारा

सुप्रिया सुळेंचं घणाघाती भाषण

"श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचे पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी"हा बाप माझ्या एकटीचा नाही, तर माझ्यापेक्षा पक्षातील सर्वांचा जास्त आहे. माझ्या बापाच्या आणि आईच्या बाबतीत कोणीही नाद करायचा नाही, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रियाताई सुळे यांनी दिला. मी महिला आहे, छोटसं बोललं तर डोळ्यात टचकन पाणी येतं, पण संघर्षाची वेळ येते तेव्हा पदर खोचून तीच महिला अहिल्या, तीच ताराराणी आणि तिच जिजाऊ होते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आता ही जबाबदारी आपल्या सर्वांवर आली आहे. ही लढाई एका व्यक्तीविरोधात नाही तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आपल्याला लढायची आहे, असे आवाहन सुप्रियाताईंनी कार्यकर्त्यांना केले.

[hindustantimes]“लढणाऱ्या पोरीसाठी बाप बुलंद..”
[ABP MAJHA]राज्यात महिलांच्या सुरक्षेबाबत गांभीर्य...