2 minutes reading time (371 words)

[hindustantimes]“लढणाऱ्या पोरीसाठी बाप बुलंद..”

“लढणाऱ्या पोरीसाठी बाप बुलंद..”

शरद पवारांचं वय काढणाऱ्या अजित पवारांना सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर

Supriya sule slams ajit pawar : शरद पवारांच्या वयावर बोलणाऱ्या ्जित पवारांना सुप्रिया सुळेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. सुळे म्हणाल्या की, श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी... हा बाप माझ्या एकटीचा नाही. तर माझ्यापेक्षा तुमचा जास्त आहे.

अजित पवार यांनीआज जोरदार शक्तिप्रदर्शन केलं करतअनेक गौप्यस्फोट केले. त्याचबरोबर अजित पवारांनी पहिल्यांदाच शरद पवार यांच्यावर थेट हल्ला चढवताना त्यांच्यानिवृत्तीवरहीभाष्य केले. शरद पवार कधी निवृत्त होणार असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. याला खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी... हा बाप माझ्या एकटीचा नाही. तर माझ्यापेक्षा तुमचा जास्त आहे.बाकी कुणावरही बोला पण बाप आणि आईचा नादकरायचा नाही. काही जण पक्षातल्या वडिलधाऱ्यांना सांगतात की तुमचं वय झालं, आता थांबा, अरे यांच्यापेक्षा आम्ही मुली बऱ्या, जेव्हा संघर्षाची वेळ येते तेव्हा तीच अहिल्या होते आणि ताराराणी होते, असा टोलाअजित पवारयांना लगावला आहे.

अजित पवार यांनी भाषणा म्हटलं की, कॉर्पोरेटमध्ये, सरकारी नोकरीत निवृत्तीचं वय ५८ असतं. अधिकाऱ्यांसाठी ६० वर्षे असतं. भाजपामध्ये ७५ वर्षांनंतर निवृत्त केलं जातं. मात्र इथं ८२ झालं, ८३ झालं, तुम्ही निवृत्त होणार कधी? दोन मे रोजी झालेल्या बैठकीत तुम्ही राजीनामा देतो म्हणून सांगितलं. मग अचानक तो निर्णय मागे घेतला. राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला? असा सवाल अजित पवार यांनी शरद पवार यांना विचारला.

यानंतर शरद पवारांना निवृत्तीचा सल्ला देणाऱ्या अजित पवारांना सुप्रिया सुळेंनी रोखठोक उत्तर दिलं आहे. काही जणांना वाटतं की, लोकांचं वय झाल्यामुळे त्यांनी केवळ आशीर्वाद द्यावेत. पण का बरं आशीर्वाद द्यावेत? रतन टाटा साहेबांपेक्षा ३वर्षांनी मोठे आहेत. आजही ते काम करतात. यावेळी सुळे यांनी सीरम इन्स्टिट्यूटचे सायरस पूनावाल, अमिताभ बच्चन, वॉरेन बफेट, फारूख अब्दुला आदिच्या वयाचा दाखला दिला. वय हा फक्त आकडा आहे, जिद्द पाहिजे, असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला.

...

Supriya Sule: “लढणाऱ्या पोरीसाठी बाप बुलंद..”, शरद पवारांचं वय काढणाऱ्या अजित पवारांना सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर-maharashtra political crisis ncp breaks up supriya sule slams ajit pawar over sharad pawar age

Supriya sule slams ajit pawar : शरद पवारांच्या वयावर बोलणाऱ्या ्जित पवारांना सुप्रिया सुळेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. सुळे म्हणाल्या की,  श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी... हा बाप माझ्या एकटीचा नाही. तर माझ्यापेक्षा तुमचा जास्त आहे.
[Zee 24 Taas]माझ्या बापाचा नाद करायचा नाही
[ABP MAJHA]बापावर बोलायचं नाही, दादांना इशारा