1 minute reading time (272 words)

[hindustantimes]‘माझ्या भावाचा असा अपमान करू नका',

‘माझ्या भावाचा असा अपमान करू नका',

सुप्रिया सुळेंचा भाजपला खोचक टोला

 सोलापूर–मला देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल खूप वाईट वाटतं. आधी त्यांचं मुख्यमंत्री पदाचं तिकीट कापलं, त्यानंतर त्यांना दोन नंबरच पद म्हणजे उपमुख्यमंत्री केलं त्यातच आता आणखी एक उपमुख्यमंत्री वाढवला आहे. माझ्या भावाचा असा अपमान करू नका, असा चिमटा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सु्प्रिया सुळे यांनी काढला आहे.

सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्यावतीने अल्पसंख्याक समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. भाजप हा मराठी माणसांच्या विरोधातील पक्ष असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर अन्याय झाला आहे. भाजपमध्ये फडणवीसांवर होत असलेल्या अन्यायाबाबत मला वेदना झाल्या आहेत. हा फडणवीस यांचा अपमान नाही,तर मागच्या ६० वर्षांपासून काँग्रेसविरुद्ध लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा अपमान आहे, अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली.

अजित पवार यांना सहा महिन्यांसाठी नाही तरपाचवर्षांसाठी मुख्यमंत्री करू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, त्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की,फडणवीस यांनी काँग्रेस विचाराचा मुख्यमंत्री व्हावा, असा आग्रह केला आहे, त्यांच्याविचारांचं मी मनापासून स्वागत करते. भाजपचे जास्त आमदार निवडून आले, तरी त्यांना काँग्रेसच्या विचारांचा मुख्यमंत्री पाहिजे, याचं मी मनापासून स्वागत करते,' असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

नांदेडच्या रुग्णालयात झालेल्या मृत्यूंवरूनही सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. 'हे सरकार खोके, ट्रिपल इंजिनचं सरकार आहे. खोक्यांच्या माध्यमातून सगळं चालत आहे. असंवेदनशील सरकार म्हणून शिंदे सरकार आहे, त्यामुळे त्यांनी क्लीन चीट दिली आहे,'असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

...

महाराष्ट्र बातम्या, Maharashtra latest News, Maharashtra News Today, Maharashtra News in Marathi - Hindustan Times Marathi

Maharashtra latest News: Read all latest update and breaking news of entertainment, politics crime of Maharashtra at marathi.hindustantimes.com,मराठी बातम्या
[sarkarnama]माढ्यातून लोकसभेसाठी शरद पवारांच्या ना...
[sarkarnama]...नाहीतर भुजबळांना करारा जवाब दिला अस...