1 minute reading time (269 words)

[sarkarnama]माढ्यातून लोकसभेसाठी शरद पवारांच्या नावाचा आग्रह

माढ्यातून लोकसभेसाठी शरद पवारांच्या नावाचा आग्रह

सुप्रिया सुळे म्हणतात...

 Pandharpur News : माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार निवडणूक लढवणार नाहीत. या वेळी राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्याला उमेदवारी दिली‌ जाईल, अशी माहिती राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. (Sharad Pawar will not contest Lok Sabha elections from Madha: Supriya Sule)

खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत आज (ता. ८ ऑक्टोबर) माळशिरस येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. त्या मेळाव्यात राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी माढ्यातून लोकसभेसाठी शरद पवारांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी माढ्यातून शरद पवार निवडणूक लढवणार नाहीत, असे स्पष्ट केले. तसेच माढ्यात आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्याला उमेदवारी दिली जाईल. सर्वांनी एकत्रित बसून लवकर उमेदवार ठरवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसने माढा आणि सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. पक्षाने माढा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर दिली आहे. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी माढ्यात दौरा सुरू केला आहे. मागील १५ दिवसांत त्यांचे दौरे वाढले आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे. या निमित्ताने त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे या माळशिरसचा दौरा करून सोलापूर शहरात येणार आहेत. महेश कोठे यांच्यासाठी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या अल्पसंख्याक समाजाच्या मेळाव्याला खासदार सुळे या उपस्थिती लावणार आहेत. त्यानंतर मोहोळ आणि कुर्डूवाडी येथे मेळावा घेणार आहेत.

[maharashtratimes]सोलापूर महत्त्वाचं शहर, खासदार म...
[hindustantimes]‘माझ्या भावाचा असा अपमान करू नका',