2 minutes reading time (328 words)

[maharashtratimes]सोलापूर महत्त्वाचं शहर, खासदार मिसिंग, विकासाचं काय?

सोलापूर महत्त्वाचं शहर, खासदार मिसिंग, विकासाचं काय?

चला पोलिस स्टेशनला, सुप्रिया सुळे आक्रमक

सोलापूर: राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे रविवारी दुपारीपासून सोलापूरच्या दौऱ्यावर होत्या. सोलापूर-हैदराबाद रोडवरील बंदेनवाज मंगल कार्यालयात अल्पसंख्याक मेळाव्यात खा.सुप्रिया सुळें व रोहिणी खडसे प्रमुख उपस्थिती म्हणून होत्या. मेळाव्यात खा.सुप्रिया सुळेंनी स्थानिक प्रश्नांवर भाषण केले. येथील लोकप्रतिनिधी देखील मिश्किल टिप्पणी करत भाजपवर टीका केली.

सोलापूरचे खासदार कोण आहेत,बॉस,मिसिंग आहेत का? सोलापूरचे खासदार कोण आहेत? मला माहिती नाही. मात्र, तुम्हाला तरी माहिती आहे का? मैंने उनको ना देखा है... ना सूना है...., कौन है भैया…? अगर बेपत्ता है, तो पुलिस ठाणें मे जाके कंप्लेंट करो अशी मिश्किल टिप्पणी करत अल्पसंख्याक मेळाव्यात सुप्रिया सुळेंनी संवाद साधला. सोलापूर हे महाराष्ट्रातलं महत्त्वाचं शहर आहे, पण या शहराचा खासदार मिसिंग असेल, विकास कसा होणार. चला पोलिस स्टेशनला मिसिंगची तक्रार दाखल करू. मला असं वाटतंय की, परत त्या अदृश्य शक्तीचा काय तरी प्रॉब्लेम आहे. अदृश्य शक्तीमुळं सोलापूरचं पाणीही गायब आणि 'एमपी'पण गायब आणि 'विकास'ही गायब अन् आमदारही गायब… असा टोला त्यांनी केंद्रीय मंत्र्यांसहित भाजपला लगावला.

पालिकेची पाणी पट्टी भरू नका ,खा.सुप्रिया सुळेंचे आवाहन

सोलापूर शहराला आठवड्याला एकदा पाणी मिळत असेल तर पालिकेची पाणी पट्टी भरू नका. पाण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेवर आयुक्तांसमोर घागर मोर्चा काढा.मला सांगा घागर मोर्चात सर्वात पुढे मी असेन असे खा.सुप्रिया सुळें यांनी आवाहन केले आहे. आपल्याला काय काय जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत, ते ठरवून घ्या. खासदार शोधणे, पाणीपट्टी न भरणे, घागर मोर्चा काढणे, स्मार्ट सिटीचं बक्षीस नेमकं आहे कुठे? असे आवाहन सुप्रिया सुळेंनी अल्पसंख्याक मेळाव्यात केले आहे.

वडापाव-वडापाव प्रमाणे सोलापूर-सोलापूर असे संसदेत ओरडणार

खासदार सुप्रिया सुळेंनी सोलापूरच्या विकासाबाबत बोलताना भाजप आणि भाजप खासदार डॉ. जय सिद्धेश्वर महाराज महास्वामी यांच्यावर सडकून टीका केली आहे. मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पार्लमेंटमध्ये असते, पण मला सोलापूरचे खासदार कधी दिसले नाहीत. जसं रेल्वेत वडापाव वडापाव म्हणून ओरडतात तसं मी पार्लमेंटमध्ये सोलापूर, सोलापूर असं ओरडणार आहे.

[tv9marathi]शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्यांना सु...
[sarkarnama]माढ्यातून लोकसभेसाठी शरद पवारांच्या ना...