1 minute reading time (290 words)

[sarkarnama]...नाहीतर भुजबळांना करारा जवाब दिला असता

...नाहीतर भुजबळांना करारा जवाब दिला असता

पवारांवरील टीकेवरून सुप्रिया सुळे आक्रमक

Solapur : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे सातत्याने शरद पवारांवर टीका करत आहेत. मी त्यांना उत्तर देऊ शकते, पण मी उत्तर देत नाही. कारण ते वयाने मोठे आहेत. ते माझ्या वयाचे असते, तर 'करारा जवाब दिला असता', असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. (...otherwise Bhujbal would have been given a befitting reply: Supriya Sule aggressive)

सुप्रिया सुळे रविवारी सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. सोलापूर शहरात माध्यमांशी बोलताना त्यांनी भुजबळांच्या टीकेबाबत भाष्य केले. त्या म्हणाल्या की, माझ्या आईने माझ्यावर जे संस्कार केले आहेत, ते जरा वेगळे आहेत. ज्यांच्या ताटात आपण कधीतरी जेवलो होतो. ते कधी विसरायचं नसतं. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हाबाबत सुनावणी सुरू आहे. छगन भुजबळ यांची टीम निवडणूक आयोगाकडे गेली आहे. आम्ही नाही. माझा निवडणूक आयोगावर पूर्ण विश्वास आहे. जे चिन्हाची लढाई करत आहेत, त्यांना अगोदरच निकाल कसा माहिती. म्हणजे पेपर फुटला आहे किंवा कुछ तो गडबड आहे, कुछ तो गोलमाल हैं, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.

'तुम्ही बेलवर आहात,' असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भुजबळ यांच्याबद्दल मागे म्हणत होते, असे सांगून सुळे म्हणाल्या की, राज्यातील सर्व फोडाफोडीच्या मागे दिल्लीची अदृश्य शक्ती आहे. ती कोण आहे, हे आम्ही आमच्याकडे एव्हीडन्स नसल्यामुळे आम्ही बोलत नाही. भारतीय जनता पक्ष ही भ्रष्ट जुमला पार्टी आहे. कारण कोल्हापूरच्या कागलमधील समरजित घाडगे यांनी ज्यांच्यावर आरोप केले, आज ते आपले (कोल्हापूर) पालकमंत्री आहेत. भाजपने केलेलं आरोप खोटे असतील, तर राष्ट्रवादीची माफी मागा किंवा वॉशिंग मशीनमध्ये घालून स्वच्छ केलं आहे, हे तरी मान्य करा, असे आवाहनही खासदार सुळे यांनी घाटगे यांना दिले.

[hindustantimes]‘माझ्या भावाचा असा अपमान करू नका',
[loksatta]“छगन भुजबळ वयाने मोठे, अन्यथा…”