1 minute reading time (149 words)

[TV9 Marathi]दिल्लीचा अदृश्य हात, त्यामुळे 24 तासात जाहिरात बदलावी लागली

दिल्लीचा अदृश्य हात, त्यामुळे 24 तासात जाहिरात बदलावी लागली

सुप्रिया सुळे यांचा टोला

'देशात मोदी आणि राज्यात शिंदे' अशी जाहिरात जवळपास सगळ्या वृत्तपत्रांमध्ये मंगळवारी झळकली. त्यानंतर विविध प्रतिक्रिया आल्या आणि या जाहिरातीचे पडसादही उमटले. त्यानंतर आज नवी जाहिरात देत शिंदे गटानं आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. जी राज्याच्या कामांवर बोलणार आहे. त्यावरून विरोधी पक्ष नेते अजित पवार, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यासह ठाकरे गटाने प्रतिक्रिया दिल्या आहेत. याचदरम्यान आता 42 टक्के त्याच्या बाजूने आहेत असं त्यांनी जाहिरातीत म्हटलं आहे. पण याचा अर्थ 58 टक्के लोक हे त्यांच्या विरोधात आहेत. हेच सिद्ध होतं. तर मी फक्त त्यांच्या वेल विशरच्या शोधात आहे. आज त्यांना जाहिरात बदलावी लागली. याचा अर्थ दिल्लीचा अदृश्य हात त्यामागे आहे. त्यामुळे 24 तासात जाहिरात बदलावी लागते अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघाती टीका करताना सरकार निवडणूक घ्यायला घाबरत आहे. कोणी तरी कुठला डोस दिला की जाहिरात बदलावी आणि फोटोही लावावे लागतात असेही त्यांनी म्हटलं आहे.

[TV9 Marathi]मेट्रो निधी उपलब्धीवरून सुप्रिया सुळे...
[ABP MAJHA]"दिल्लीच्या अदृश्य हातामुळे 24 तासात जा...