1 minute reading time (151 words)

[TV9 Marathi]मेट्रो निधी उपलब्धीवरून सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारवर टीका

मेट्रो निधी उपलब्धीवरून सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारवर टीका

पुणे येथे खासदार सुप्रिया सुळे यांनी  पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज्यात कायदा आणि सुव्यवस्थची स्थिती अतिशय खराब असल्याचे त्यांनी  स्पष्ट केले. राज्यात अनेक ठिकाणी राजरोजपणे गुन्हे घडत असून गुन्हेगारांना कायद्याचा धाक शिल्लक राहिलेला नाही हि वस्तुस्थिती आहे . हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले. सुप्रिया सुळे म्हणाल्या कि,मी मुंबइ येथे लोकलमध्ये अत्याचार झालेल्या मुलीच्या पालकांची भेट घेतली आहे. पोलीस यंत्रणेने याप्रकरणी योग्य दिशेने तपास करुन या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा होइल यासाठी प्रयत्न करावेत, आमचा विकासाला विरोध नाही. पुण्यामध्ये मेट्रो व्हावी हे आमचेही म्हणणे आहे. वीज, कचऱ्याचे नियोजन, सडक आणि पाणी या नागरीकांच्या व कोणत्याही शहराच्या मुलभूत गरजा आहे.यासाठी महापालिकेकडे पैसे नाहीत परंतु मेट्रोसाठी हजारो कोटी रुपये उपलब्ध करुन दिले जातात.आम्ही शहराच्या मुलभूत गरजांसाठी पैसे मागत आहोत परंतु ते दिले जात नाहीत याला आमचा विरोध आहे. मेट्रोला जेवढे महत्त्व आणि निधी दिला जातो त्याच्या काही अंशी शहराच्या मुलभूत गरजासाठी दिले तर बरे होइल, अशी भूमिका सुळे यांनी याप्रसंगी मांडली. 

[divyamarathi]पुण्यात कोयता गँगची पुन्हा दहशत प्रक...
[TV9 Marathi]दिल्लीचा अदृश्य हात, त्यामुळे 24 तासा...