2 minutes reading time (408 words)

[divyamarathi]पुण्यात कोयता गँगची पुन्हा दहशत प्रकरणी सुप्रिया सुळे यांची पोलिस आयुक्तांशी चर्चा

पुण्यात कोयता गँगची पुन्हा दहशत प्रकरणी सुप्रिया सुळे यांची पोलिस आयुक्तांशी चर्चा

गृहमंत्र्यानी लक्ष घालण्याची मागणी

पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयता गँग कमालीची सक्रीय झाली असून या टोळीतील गुन्हेगार दिवसा देखील तोडफोड करत आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याशी चर्चा केली. याबरोबरच शहरातील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गृहमंत्र्यानी आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी सोमवारी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात कोयता गँगची दहशत वाढली असून गाड्या फोडणे, नागरीकांना धमकावून त्यांना मारहाण करणे असे प्रकार सुरू आहेत. आजही वारजे परिसरात या गँगने धुमाकूळ घालत गाड्यांच्या काचा फोडल्या. या घटनेबाबत सुळे यांनी पुण्याच्या पोलिस आयुक्तांशी सविस्तर चर्चा केली. पुणे आणि परिसरात वाढलेल्या या गुन्हेगारीवर आळा घालणे अतिशय गरजेचे असून संघटीत गु्न्हेगारीवर कायमचा आळा घालण्यासाठी राज्याच्या गृहमंत्र्यांनी पुढाकार घेऊन उचित कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

काेयत्याने वार करुन केले गंभीर जखमी


गुलटेकडी येथील मिनाताई ठाकरे वसाहतीत राहणाऱ्या कृष्णा सुनील क्षिरसागर (वय-22) या तरुणावर तीनजणांनी डाेक्यवर, पायावर काेयत्याने गंभीर मारहाण करुन त्यास जखमी केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात तीन आराेपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

साेहेल नाझीम सय्यद (वय-23), हुजेर जाकीर सैय्यद व इतर एकजण (सर्व रा.गुलटेकडी,पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहे. आराेपी साेहल सैय्यद हा तक्रारदार यांचे पत्नीचा चुलत भाऊ आहे. काेणतेही कारण नसताना त्यांनी तक्रारदार यांचेवर हमला करुन साेहेल याने तक्रारदार याचे डाेक्यावर, पायावर काेयत्याने गंभीर मारहाण करुन त्यास जखमी केले. तर हुजेर सैय्यद याने तक्रारदारास कानावर, पाेटावर मारुन जखमी करुन इतर अनाेळखी व्यक्तींनी बियरची बाॅटल मारुन जखमी केले. तसेच तक्रारदार यांचे डाेक्यावर, कानामागे, दाेन्ही पायाचे पाेटरी जवळ समाेरील बाजूस जखम हाेऊन रक्त निघून ते गंभीर जखमी झाले आहे. याबाबत स्वारगेट पोलिस पुढील तपास करत आहे.

...

पुण्यात कोयता गँगची पुन्हा दहशत प्रकरणी सुप्रिया सुळे यांची पोलिस आयुक्तांशी चर्चा; गृहमंत्र्यानी लक्ष घालण्याची मागणी | Pune Koyta Gang Update Supriya Sule Meet Police Commissioner - Divya Marathi

पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयता गँग कमालीची सक्रीय झाली असून या टोळीतील गुन्हेगार दिवसा देखील तोडफोड करत आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याशी चर्चा केली. याबरोबरच शहरातील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गृहमंत्र्यानी आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी सोमवारी केली आहे. | पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयता गँग कमालीची सक्रीय झाली असून या टोळीतील गुन्हेगार दिवसा देखील तोडफोड करत आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याशी चर्चा केली. याबरोबरच शहरातील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गृहमंत्र्यानी आदेश द्यावेत, अशी मागणी Pune Koyta Gang Update Supriya Sule Meet Police Commissioner
[letsupp]पुण्यात पुन्हा कोयता गॅंगची दहशत
[TV9 Marathi]मेट्रो निधी उपलब्धीवरून सुप्रिया सुळे...