1 minute reading time (73 words)

[TV9 Marathi]'हा देशाचा प्रश्न, त्यामुळे संसदेत चर्चा झालीच पाहिजे' : सुप्रिया सुळे

'हा देशाचा प्रश्न, त्यामुळे संसदेत चर्चा झालीच पाहिजे' : सुप्रिया सुळे

इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम भारतावरही जाणवू लागल्याची चिंता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी इंधनसाठा आणि गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेबाबत गंभीर परिस्थिती निर्माण होत असल्याचे सांगितले. सुळे म्हणाल्या की, सध्या देशात इंधनसाठा पुरेसा उरलेला नसल्याच्या चर्चा सुरू आहेत. तसेच अनेक ठिकाणी गॅस सिलेंडरसाठी नागरिकांना रांगा लावाव्या लागत असल्याचेही चित्र दिसत आहे. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. 

[Jai Maharashtra News]माझ्या दादाला न्याय मिळाला प...
[Marathi Oneindia]शरद पवार राज्यसभा निवडणूक लढवणार...