1 minute reading time
(67 words)
[Jai Maharashtra News]माझ्या दादाला न्याय मिळाला पाहिजे, सुळेंनी हात जोडून केली चौकशीची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या कुटुंबावर आलेल्या संकटाचा पाढा वाचतानाच, देशापुढील जागतिक आव्हानांवरून केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. "माझ्या दादाला न्याय मिळालाच पाहिजे, ही आमची ठाम मागणी आहे," असे म्हणत त्यांनी अजित पवारांच्या संदर्भातील प्रकरणावर संसदेत चर्चा करण्याची विनंती केली. या लढाईत उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेल्या खंबीर साथीबद्दल त्यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

