1 minute reading time (230 words)

[TV9 Marathi]इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची सुप्रिया सुळे यांच्याकडून मागणी

इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची सुप्रिया सुळे यांच्याकडून मागणी

इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम भारतावरही जाणवू लागल्याची चिंता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी इंधनसाठा आणि गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेबाबत गंभीर परिस्थिती निर्माण होत असल्याचे सांगितले. सुळे म्हणाल्या की, सध्या देशात इंधनसाठा पुरेसा उरलेला नसल्याच्या चर्चा सुरू आहेत. तसेच अनेक ठिकाणी गॅस सिलेंडरसाठी नागरिकांना रांगा लावाव्या लागत असल्याचेही चित्र दिसत आहे. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. याबाबत केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी करत सुळे म्हणाल्या की, त्या संसदेत सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची विनंती करणार आहेत. कारण हा केवळ एका पक्षाचा नव्हे तर संपूर्ण देशाचा प्रश्न आहे. तसेच परराष्ट्र धोरणाबाबत सरकारकडून जरी अधिकृत भूमिका मांडण्यात आली असली, तरी त्या विषयावर संसदेत सविस्तर चर्चा होणे आवश्यक असल्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सध्या जागतिक परिस्थिती अत्यंत गंभीर असून जग अडचणीत असल्याचेही सुळे यांनी यावेळी नमूद केले. 

...

Supriya Sule | इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची सुप्रिया सुळे यांच्याकडून मागणी - Marathi News | Supriya Sule Raises Concern Over Impact of Iran Israel US Conflict on India Demands All Party Meeting | TV9 Marathi

इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम भारतावरही जाणवू लागल्याची चिंता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी इंधनसाठा आणि गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेबाबत गंभीर परिस्थिती निर्माण होत असल्याचे सांगितले.
[Jai Maharashtra News]'माझ्या दादाला न्याय मिळालाच...
[Lokmat]इराण-इस्रायल युद्धादरम्यान देशाच्या परराष्...