2 minutes reading time (317 words)

[civic mirror]वाहतूक कोंडीचे ग्रहण लागलेल्या पुण्यात शाळेच्या बससाठी हवी वेगळी लेन; सुप्रिया सुळेंच्या मागणीने चर्चेला उधाण

वाहतूक कोंडीचे ग्रहण लागलेल्या पुण्यात शाळेच्या बससाठी हवी वेगळी लेन; सुप्रिया सुळेंच्या मागणीने चर्चेला उधाण

पुण्यातील वाहतुक कोंडीचा प्रश्न सुटता सुटेना. अनेक योजना आखून देखील त्या फोल ठरत आहेत. अशातच, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शाळेच्या बससाठी हवी स्वतंत्र लेन हवी अशी मागणी केली आहे. 'शाळांच्या वाहनांसाठी सकाळी आणि दुपारच्या वेळी स्वतंत्र लेन द्यावी. यामुळे वाहतूक आणखी सोपी व सुटसुटीत होईल.' असे सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांच्या या मागणीनंतर काही प्रवाशांनीदेखील कारवाईची मागणी केली आहे. 

सूस परिसरात दोन मोठ्या शाळा आहेत. याखेरीज आणखी काही छोट्या शाळा आहेत. या शाळांच्या बसेस रोज सकाळी आणि दुपारी रस्त्यावर विद्यार्थ्यांची ने-आण करतात. पण त्यांची वाहतूक थोडी अनियंत्रित पद्धतीची आहे. त्यामुळे वाहनांना प्रवास करताना अडचणी येतात. हा परिसर हिंजवडीच्या फेज ३ या परिसराशी जोडला गेला आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन 'राजीव गांधी इन्फोटेक पार्क' साठी प्रवास करणाऱ्या नागरीकांची देखील मोठी संख्या आहे. माझी प्रशासनास विनंती आहे की कृपया आपण शाळांच्या वाहनांसाठी सकाळी आणि दुपारच्या वेळी स्वतंत्र लेन द्यावी. यामुळे वाहतूक आणखी सोपी व सुटसुटीत होईल. अशा आशयाचे ट्विट सुळे यांनी केले आहे.

त्याच्या या ट्विटनंतर स्नेहा राय नावाच्या प्रवासीनेदेखील याबाबत तक्रार केली आहे. "मोठ्या स्कूल बसेस मुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. त्यामुळे अनेकदा बसेसे वळण्यात विलंब होतो. अशातच कामाला जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रासाला सामोर जावे लागते. तसेच या समस्येमुळे विद्यार्थ्यांना शाळेत पोहचायला उशीरा होता. येत्या शालेय सत्रामुळे आणि परिसरात वाढत्या वाहतुकीमुळे ही समस्या आणखी बिकट होण्यापूर्वी अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई कराव." असे राय यांनी म्हटले आहे.

तर, शालेय बसेस वेळेवर विद्यार्थ्यांना घेऊन जातात आणि सोडतात, परंतु त्यांच्या बेशिस्त पार्किंगमुळे आणि अरुंद रस्त्यांवर अचानक वाहने थांबल्यामुळे नियमित वाहतूक विस्कळीत होते. सुस परिसर हा हिंजवडी फेज ३ आणि प्रमुख रोजगार केंद्र असलेल्या राजीव गांधी इन्फोटेक पार्कला जोडणारा प्रमुख मार्ग असल्याने, विशेषतः गर्दीच्या कार्यालयीन वेळेत ही समस्या निर्माण होते." अशी तक्रार सुधांशू गुप्ता यांनी केली आहे. 

[Navshakti]गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष...