1 minute reading time (69 words)

[TV9 Marathi]सुप्रिया सुळे बारामतीतील धनगर आंदोलकाच्या भेटीला

सुप्रिया सुळे बारामतीतील धनगर आंदोलकाच्या भेटीला

धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून बारामतीत उपोषणाला बसलेल्या चंद्रकांत वाघमोडे यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य व केंद्र सरकार असंवेदनशील असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सुळे यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार तोफ डागली. मराठा, धनगर, मुस्लिम व लिंगायत आरक्षणासाठी राष्ट्रवादी कायम या समाजासोबत असून येत्या अधिवेशनात संसदेत हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे त्या म्हणाल्या.

[Mumbai Tak]सुप्रिया सुळे धनगर उपोषण करणाऱ्यांच्या...
[Saam TV ]भाजप आणि राष्ट्रवादीच्या कौटुंबिक संबंधा...