1 minute reading time (120 words)

[Saam TV ]भाजप आणि राष्ट्रवादीच्या कौटुंबिक संबंधांववर सुळेंच मोठं वक्तव्य

भाजप आणि राष्ट्रवादीच्या कौटुंबिक संबंधांववर सुळेंच मोठं वक्तव्य

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बारामतीतील एका कार्यक्रमांमध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकाच स्टेजवर दिसले. त्याआधी प्रतापराव पवारांच्या घरी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली होती. आता दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने सर्व पवार कुटुंबीय एकत्र येणार आहेत. त्यामध्ये अजित पवार सहभागी होतील की नाही असा प्रश्न विचारल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आमचे वैचारिक मतभेद आहेत पण मनभेद नाहीत. जेव्हा आपले वय वाढते तेव्हा वैचारिक प्रगल्भता वाढली पाहिजे. आमची लढाई वैचारिक आहे, व्यक्तिगत नाही. राजकीय मतभेद आहेत पण भाजपच्या अनेक नेत्यांशी आमचे चांगले संबंध आहेत. दादा कार्यक्रमात मास्क लावून बसले होते. त्यामुळे त्यांना भेटण्याची मुभा आहे की नाही हे डॉक्टर ठरवतील. तुम्हा सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद हे शरद पवारांचे टॉनिक आहे असे खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितलं.

[TV9 Marathi]सुप्रिया सुळे बारामतीतील धनगर आंदोलका...
[LOKMAT]पवार ओबीसी वादावर सुप्रिया सुळे स्पष्टच बो...