2 minutes reading time (335 words)

[sakal]सत्ता आल्यावर सरसकट कर्जमाफी देऊ - खासदार सुप्रिया सुळे

सत्ता आल्यावर सरसकट कर्जमाफी देऊ - खासदार सुप्रिया सुळे

Malshiras News : माजी लढाई शिंदे सेना किंवा अजित पवार गटाशी नसून दिल्लीत असणाऱ्या अदृश्य शक्ती भारतीय जनता पक्षा बरोबर आहे. आम्ही कधीच सुडाचे राजकारण केले नसून सत्ता आल्यावर सेवा,सन्मान व स्वाभीमान या तीन तत्वानुसार काम करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. माळशिरस येथील ग्रामपंचायतीच्या निर्वाचित सरपंच आरती माऊली यादव, उपसरपंच अशोक यादव व सर्व सदस्यांचा सन्मान तसेच येथील विविध विकासकामांचे उद्घाटन खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी आमदार संजय जगताप, सुदामराव इंगळे, विजय कोलते, माणिकराव झेंडे ,प्रदीप कोमल, गणेश जगताप, नंदू काका जगताप, सुनिता कोलते ,गौरी कुंजीर ,सोनाली यादव, माऊली यादव, पुष्कराज जाधव ,एकनाथ तात्या यादव ,शहाजान रफिक शेख ,कादी मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. खासदार सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की मी देखील आज लाल दिव्याच्या गाडीमध्ये फिरू शकले असते. माझ्यासमोर दोन पर्याय होते. एक सत्ता आणि दुसरा संघर्ष मात्र मी संघर्षाचा पर्याय निवडला व आज पाच महिन्यानंतर मला वाटतं योग्य निर्णय घेतला.

आमची लढाई ही दिल्लीतील अदृश्य शक्तीविरुद्ध असून मन घट्ट करावे लागणार असून बुद्धीने लढावं लागणार आहे .वडिलांकडे पाहिल्यानंतर संघर्ष करण्याचं बळ मिळतं असे देखील त्या म्हणाल्या . आमदार संजय जगताप यांनी माजी राज्यमंत्री विजय शिवतरे यांच्या वरती सरकून टीका करताना दहा वर्षात स्वतःचं घर सोडून काहीच उभं करता आलं नाही .दहा वर्षात त्यांनी किती निधी आणला.

तालुक्यात कारखाना काढायचा सोडून तो नगरमध्ये काढला व तेथील लोकांना इंटरनॅशनल स्कूल सुरू करण्याचे आश्वासन देत आहेत. आगामी काळात पुरंदर तालुक्यातील वाढत्या ऊसाचे क्षेत्र लक्षात घेता कारखाना काढण्याबाबत विचार करावा लागेल असे देखील त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात विजय कोलते ,लक्ष्मण महाराज यादव, दशरथ यादव ,बाळ तात्या यादव, गणेश ढोले,म्हस्कू शेंडगे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माऊली यादव यांनी केले .सूत्रसंचालन जयेश गद्रे यांनी व आभार रफिक शेख यांनी मांडले.

[sarkarnama]ईडी चौकशीला जाताना रोहित पवारांसोबत सु...
[ahmednagarlive24]ट्रिपल इंजिन सरकारमधील मंत्र्यां...