2 minutes reading time (309 words)

[sarkarnama]ईडी चौकशीला जाताना रोहित पवारांसोबत सुप्रिया सुळे

ईडी चौकशीला जाताना रोहित पवारांसोबत सुप्रिया सुळे

म्हणाल्या, सत्याचा विजय होईल...

Mumbai : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. ईडीच्या कार्यालयात जाण्या आधी रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले. ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करत घोषणाबाजी केली. ईडी कार्यालयाबाहेर रोहित पवार यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे या देखील होत्या. सुप्रिया सुळे यांचे आशिर्वाद घेत रोहित पवार चौकशीसाठी ईडी कार्यालयात गेले.

सत्यमेव जयते. सत्याचा विजय होईल. सध्याचा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे. परंतु मला खात्री आहे की सत्याचा विजय होईल. आव्हानांवर मात करून आम्ही विजय मिळवू. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी संघर्ष यात्रा काढली कदाचित हा त्याच सुडाचे राजकारण असेल, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी ( Supriya sule) दिली आहे.

ईडी चौकशीला जाताना रोहित पवार यांच्या हातात जी फाइल होती त्यावर महापुरुषांचे फोटो तसेच विचारांचे वारस असे लिहले असल्याचे निदर्शनास आले. रोहित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. निष्ठावान मावळ्यांना सोबत घेऊन ज्यांनी बलाढ्य शत्रूलाही नेस्तनाबूत केलं त्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचं आराध्य दैवत, प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन. संविधान आणि लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरालाही नमस्कार, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

रोहित पवार यांच्यावर केलेले आरोपांवर मंगळवारी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीकडून पत्रकार परिषद घेण्यात आले. राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवक्ता विद्या चव्हाण म्हणाल्या की, आचारसंहितेमध्ये प्रशासकीय यंत्रणांचा वापर करून घेता येणार नाही. त्यामुळे ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स यांच्या वापराने जेवढ्या जास्तीत जास्त लोकांना त्रास देता येईल हे तत्व महाराष्ट्रात देवेंद्र फडवणीस यांनी राबवलेले आहे. एकीकडे राम मंदिर आणायचे, एकीकडे उद्घाटन करायचे आणि दुसरीकडे सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नासाठी काम करणाऱ्या रोहित दादांसारख्या आमदाराला ईडीचा धाक दाखवणे हे योग्य नाही. आम्ही सर्व एकत्र लढू, आम्ही घाबरणार नाही. 

[tv9marathi]सत्याचाच विजय होईल… आत्या गहिवरली
[sakal]सत्ता आल्यावर सरसकट कर्जमाफी देऊ - खासदार स...