1 minute reading time (124 words)

[TV9 Marathi]लोकशाही उरलीच नाही,

दडपशाही सुरू असल्याची सुळेंची टीका

फक्त दडपशाही सुरू असल्याची सुळेंची टीका

शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांना सोबत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यभरात गद्दार दिवस म्हणून साजरा केला जात आहे. तर एका आंदोलनात पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे देखील सहभागी झाल्या होत्या. मात्र पोलिसांनी दडपशाहीचा वापर करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर आंदोलन करू दिले नाही. त्यावरून त्यांनी पोलिस प्रशासनाकडून वापरल्या जात असलेल्या दबावतंत्राचा निषेध केला. तसेच "रस्त्यावर आंदोलन करण्यासाठी परवानगी मिळत नसेल तर ही दडपशाहीच आहे असं म्हणावं लागेल असे म्हणाल्या. अशा या दडपशाहीसमोर महाराष्ट्र कधी झुकलेला नाही आणि झुकणारही नाही. जे गद्दार असतील त्यांना गद्दार म्हणायची ताकद आमच्यात आहे, पोलिसांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी आम्हाला जेलमध्ये टाकावं, आम्ही जेलबंद आंदोलनही करू, असे त्यांनी सांगितले.

[Saam TV]आमच्यावर दिलदारपणे टीका करावी
[eduvarta]शालेय साहित्य महागल्याने खासदार सुप्रिया...