1 minute reading time (243 words)

[eduvarta]शालेय साहित्य महागल्याने खासदार सुप्रिया सुळे यांची नाराजी

शालेय साहित्य महागल्याने खासदार सुप्रिया सुळे यांची नाराजी

केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली महत्वाची मागणी

नव्या शैक्षणिक वर्षाला सुरूवात झाली असून अजूनही पालक (Parents) मुलांच्या साहित्य खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी करत आहेत. पण वह्या-पुस्तकांपासून इतर शालेय साहित्य (School Materials) खरेदी करताना पालकांचा खिसा रिकामा होत आहे. बहुतेक साहित्य महागल्याच्या पालकांच्या तक्रारी असून खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनीही त्यावरून आवाज उठविला आहे.

खासदार सुळे यांनी शालेय साहित्याच्या किंमतींचा मुद्दा उपस्थित केला आहे. गेल्या काही वर्षांत शालेय साहित्याच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यावर्षी देखील शालेय साहित्य ३५ ते ४० टक्क्यांनी महागले. एकीकडे अगोदरच महागाईचा आगडोंब उसळला असताना शालेय साहित्याच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने पालकांना तारेवरची कसरत करावी लागते, असे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

जर शासनाने शालेय साहित्यावरील जीएसटी मागे घेतला तर या किंमती कमी होतील. याबाबत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सर्व प्रकारच्या शालेय साहित्यावरील जीएसटी माफ करावा. यामुळे शालेय साहित्याच्या किंमतीमध्ये घट होऊन ती सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील, अशी मागणीही खासदार सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

दरम्यान, यंदा बालभारतीच्या पुस्तकांच्या किंमतीही वाढल्या आहेत. पुस्तकांमध्ये विविध बदल करण्यात आले असून चार सत्राचे चार भाग केले आहेत. एका भागामध्ये चार विषयांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच त्यामध्ये वह्यांची पानेही जोडण्यात आली आहे. पण किंमती वाढल्याने पालकांमध्ये नाराजी आहे.

...

शालेय साहित्य महागल्याने खासदार सुप्रिया सुळे यांची नाराजी; केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली महत्वाची मागणी - Eduvarta- News Portal

गेल्या काही वर्षांत शालेय साहित्याच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यावर्षी देखील शालेय साहित्य ३५ ते ४० टक्क्यांनी महागले, अशी नाराजी खासदार सुळे यांनी व्यक्त केली आहे.
[TV9 Marathi]लोकशाही उरलीच नाही,
[saamtv]अजितदादा राजकारणातील अमिताभ बच्चन