2 minutes reading time (406 words)

[Maharashtra Times]राजीनामा दिला, पण नैतिकतेचा 'न' ही म्हणत नाहीत, संतोष देशमुखांचा जीव घेताना.., सुप्रिया सुळेंची सडकून टीका

राजीनामा दिला, पण नैतिकतेचा 'न' ही म्हणत नाहीत, संतोष देशमुखांचा जीव घेताना.., सुप्रिया सुळेंची सडकून टीका

पुणे: धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला आहे. तब्येत आणि सदसदविवेक बुद्धीला स्मरुन राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. पत्रकार परिषद घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनाम्यावरुन सरकारला खडे बोल सुनावले आहेत. त्यांनी अनेक मुद्दे पत्रकार परिषदेत मांडले आहेत.

राजीनाम्याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तब्येतीमुळे राजीनामा दिल्याचे ट्विट केले आहे. मला महाराष्ट्राला आणि त्यांच्या पक्षाला अतिशय विनम्रपणे विचारायचे आहे. उपमुख्यमंत्री आणि भुजबळ म्हणत आहेत की नैतिकतेवर त्यांनी राजीनामा दिला आहे. पण ज्यांनी राजीनामा दिला त्यांच म्हणण वेगळ आहे. याबद्दल स्पष्टता हवी.आज ८४ दिवस झाले आहेत. मला काही तथ्य तुमच्यासमोर आहेत. काल चार्जशीट फाईल झाली त्यातील फोटो बाहेर आले. या अगोदर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्‍यांनी हे फोटो पाहिले असणार आहेत. तर ८४ दिवस लागले आहेत या व्यक्तीचा राजीनामा घ्यायला. राजीनामा घेण हा केंद्रबिंदु नाहीच सगळेच कटातील साथीदार आहेत.

संदीप क्षीरसागर वारंवार म्हणत आहेत की कृष्णा आंधळेचा सीडीआर (कॉल डेटा रेकॉर्ड) द्या. हा कृष्णा आंधळे गायब होतोच कसा सातवा खूनी गायब आहे. हे सर्व कटातील साथीदार आहे.यासंबंधी माध्यमांमध्ये सुरेश धस आणि दमानिया यांनी सीडीआर दाखवले आहेत. विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांनी क्रुर हत्या सुरु असताना वाल्मिक कराडांना व्हिडिओ कॉल केलेले आहे. त्यानंतर लगेच कराडने धनंजय मुंडेंना फोन केला आहे. हे सर्व माध्यमांनी दाखवले आहे. हे सर्व जण ऐकामेकांना व्हिडिओ कॉल करत होते याचा अर्थ आम्ही काय काढायचा. ८४ दिवस ही सर्व माहिती सरकारला माहिती होती. आणि मंत्री म्हणतात मी आजारी म्हणून राजीनामा दिला.हीच ती नैतिकता.

मला छगन भुजबळ आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्र्‍यांना विचारायचे आहे की तुम्ही म्हणलात की नैतिकतेवर राजीनामा दिला पण ज्याने राजीनामा दिला ती नैतिकतेचा न ही म्हणत नाही. ते म्हणतात मला बर नाही आहे म्हणून राजीनामा दिला. हताश हे राज्य. सुन्न झाली आहे जनता. जर नैतिकतेवर राजीनामा असेल तर ८४ दिवसांनी आली ही नैतिकता. ते नैतिकता मान्यही करत नाही. सुरेश धस म्हणतात ते खर आहे नैतिकता आणि यांची कधीच गाठ झाली नाही. वाल्मिक कराड तुरुंगात आहेत तिथले कॅमेरे बंद आहेत .कराडला व्हिआयपी वागणूक दिली कशी जाते.मुख्यंमंत्र्यांकडे यासाठीच वेळ मागत आहे. अवदा कंपनीच्या या प्रकरणात ईडी आणि सीबीआय लागू झाली पाहिजे होती.

...

Dhananjay Munde Resignation: राजीनामा दिला, पण नैतिकतेचा 'न' ही म्हणत नाहीत, संतोष देशमुखांचा जीव घेताना.., सुप्रिया सुळेंची सडकून टीका - dhananjay munde has said that he has resigned due to poor health. supriya sule has harshly criticized - Maharashtra Times

Supriya Sule On Dhananjay Munde Resignation - धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ट्विट केले आहे. या ट्विटवर खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारपरिषदेत सडकून टिका केली आहे.
[Maharashtra Desha]वाल्मिक कराडने ‘तो’ फोन कोणाला ...
[TV9 Marathi]मुंडेंचा राजीनामा… सुप्रिया सुळेंनी क...