1 minute reading time (243 words)

[Maharashtra Desha]वाल्मिक कराडने ‘तो’ फोन कोणाला केला? मुंडेंवर Supriya Sule यांचा सर्वात मोठा आरोप

वाल्मिक कराडने ‘तो’ फोन कोणाला केला? मुंडेंवर Supriya Sule यांचा सर्वात मोठा आरोप

Supriya Sule संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येचे फोटो, व्हिडिओ समोर येताच मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी वाढू लागली होती. अखेर आज धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे दिला आहे.

वैद्यकीय कारणास्तव आपण राजीनामा देत आहे, असे धनंजय मुंडे यांनी कारण दिले आहे. यावरून त्यांच्यावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे मुंडेंच्या अडचणी वाढू शकतात.

"कृष्णा आंधळे गायब होतोच कसा? विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांनी वाल्मिक कराड याला फोन केले असून त्याचा व्हिडिओ कॉल संपल्याबरोबरच कराडने धनंजय मुंडे यांना कॉल केले आहेत. त्यावेळी धनंजय मुडे आणि वाल्मिक कराड हे संपर्कात होते," असा गंभीर आरोप सुळेंनी केला आहे.

"ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणतात की नैतिकतेवर राजीनामा दिला आहे. पण मुंडेंनी नैतिकता चा न देखील वापरला नाही. धनंजय मुडे आणि नैतिकता यांची कधी भेट झाली नाही," असा गंभीर आरोप देखील सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे धनंजय मुंडे अडचणीत येऊ शकतात. या आरोपावर आता धनंजय मुंडे हे त्यांना काय प्रत्युत्तर देतात? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

[Maharashtra Times]राजीनामा दिला, पण नैतिकतेचा 'न'...