1 minute reading time (220 words)

[loksatta]“मराठा तरुणांना लाभांपासून दूर…”

“मराठा तरुणांना लाभांपासून दूर…”

हातात पोस्टर्स घेऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मंत्रालयाबाहेर आंदोलन

मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन तीव्र झालं आहे. आरक्षणासाठी काही ठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलनं केली जात आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्यासह काही ठिकाणी मराठा आंदोलक उपोषणाला बसले आहेत. दुसऱ्या बाजूला काही ठिकाणी मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीच्या घटना समोर आल्या आहेत. काही ठिकाणी आंदोलकांनी नेत्यांना घेराव घातल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर मराठा आंदोलनाची व्यापकता आता आणखी वाढली आहे. अनेक आमदार, खासदार आणि मंत्रीदेखील आंदोलनं करू लागले आहेत.

महाराष्ट्रातल्या अनेक मराठा आमदारांना मतदारसंघांमधील नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागतं आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी आमदारांनी मंत्रालयाबाहेर आंदोलन सुरू केलं आहे. अनेक मराठा आमदार मंगळवारपासून (३१ ऑक्टोबर) मंत्रालयाबाहेर आंदोलन करत आहेत. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद गटातील अनेक आमदार आणि खासदारांनी मंत्रालयाबाहेरच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं.

या आंदोलनावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वेगवेगळ्या मागण्या करणारे पोस्टर्स झळकावले. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, गरीब विद्यार्धी आणि मराठा तरुणांना लाभांपासून वंचित ठेवणाऱ्या शासनाचा धिक्कार असो, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तात्काळ विशेष अधिवेशन बोलवा, अशा घोषणा आणि मागण्या करणारे पोस्टर्स राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावेळी झळकावले.

...

"मराठा तरुणांना लाभांपासून दूर...", हातात पोस्टर्स घेऊन शरद पवार गटातील नेत्यांचं मंत्रालयाबाहेर आंदोलन | NCP Leaders Supriya Sule Rohit Pawar Protest For Maratha Reservation | Loksatta

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद गटातील अनेक आमदार आणि खासदारांनी मंत्रालयाबाहेरच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं.
[lokmat]"...ते शिंदे गटाचा विश्वासघात करतायत सांभा...
[tv9marathi]संभल के रहो, इस भाजप से…