1 minute reading time (144 words)

[TV9 Marathi]राज्यात सारखंच तणावपूर्ण वातावरण कसं असू शकतं?

राज्यात सारखंच तणावपूर्ण वातावरण कसं असू शकतं?

सर्व घटनेला गृह विभाग जबाबदार- खासदार सुप्रिया सुळे 

 मुंबई: चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका विद्यार्थीनीची हत्या करण्यात आली आहे. तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चर्चगेटसारख्या गजबलेल्या भागात झालेल्या या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या संपूर्ण घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे.शासकीय इमारतीमध्ये किंवा हॉस्टेलमध्ये सीसीटीव्ही सारख्या सुविधा बसवल्या पाहिजेत. हॉस्टेलसारख्या ठिकाणी मुलींच्या रूममध्ये अलार्म बेल लावायला हवेत. जेव्हा भारतीय जनता पक्ष सत्तेत येतो तेव्हा कायमच अशा गोष्टी कशा घडतात? सर्व ठिकाणी असं कस होऊ शकतं ? लोकांमध्ये भीतीच वातावरण आहे. मुलींची सुरक्षा करण्यात राज्य सरकार आणि केंद्र सरकार अपयशी ठरलं आहे. दिल्लीमध्ये कुस्तीपटुंची भेट घ्यायला अनुराग ठाकूर तयार झाले आहेत. ही चांगली बाब आहे, पण हे सर्व भाजपचं अपयश आहे एवढं नक्की. कुस्तीवीरांना एवढं आंदोलन का कराव लागलं हे भाजपने पाहावं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

[ABP MAJHA]सुप्रिया सुळे कीर्तनात तल्लीन
मुंबईत टेक्स्टाईल कर्मचाऱ्यांचं आंदोलन