1 minute reading time (169 words)

[ tv9 marathi]तुमच्यापेक्षा पोरी परवडल्या

सुप्रिया सुळे अजित पवार यांच्यावर गरजल्या

सुप्रिया सुळे अजित पवार यांच्यावर गरजल्या

राष्ट्रवादीतील (NCP Crisis) दोन गटांनी आजचा दिवस गाजवला. अजित पवार(Ajit Pawar) यांनी, प्रत्येकाचा एक काळ असतो, असे सूचवत, शरद पवार यांनी आता आशिर्वाद द्यावेत असे अप्रत्यक्षपणे सुचवले. काळानुसार, राजकारण बदलावं लागते, निर्णय घ्यावा लागतो, असे त्यांनी सुचवले. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी वयाचा दाखला देणाऱ्या नेत्यांना सुनावले. वय हा फक्त आकाड आहे, असा टोला त्यांनी अजित पवार यांना लगावला. आमच्यावर किती पण टीका करा. पण बापाचा नाद करायचा नाही, असा सज्जड दम त्यांनी विरोधकांना भरला. शाब्दिक चकमकीला आजपासून सुरुवात झाली आहे. आता या फैरी कोणत्या पातळीवर जातील, हे येत्या काही दिवसात उभा महाराष्ट्र पाहणार आहे.

सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्षावर चांगलेच तोंडसूख घेतले. भाजपनेच राष्ट्रवादीत खोडा घातल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये प्रबळ आहे. हाच धागा पकडत त्यांनी भाजप हा सध्या सर्वात भ्रष्टाचारी पक्ष असल्याचा घणाघात केला. राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारी भाजपाच, राष्ट्रवादीतील नेत्यांसोबत बसल्याचा अप्रत्यक्षपणे त्यांनी सुनावले. ही लढाई एका व्यक्तीच्या विरोधात नाही तर भारतीय जनता पक्षाच्या प्रवृत्तीविरोधात असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. वाय. बी. चव्हाण सभागृहात त्यांनी भावना व्यक्त केल्या 

[Loksatta]“आलं तर आलं तुफान”
[loksatta]“श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, ल...