1 minute reading time (248 words)

[Loksatta]“आलं तर आलं तुफान”

“आलं तर आलं तुफान”

अजित पवारांच्या बंडखोरीनंतर सुप्रिया सुळेंचं सूचक भाष्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तासंघर्षाचा दुसरा अध्याय सुरू झाला आहे. बंडखोरीनंतर अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि 'घड्याळ' या पक्षचिन्हावर दावा केला आहे. याबाबतचं पत्रही निवडणूक आयोगाला दिलं आहे. अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, अशा आशयाचं पत्रही निवडणूक आयोगाकडे सादर केलं आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांच्या बंडखोरीवर सूचक भाष्य केलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे विचार उद्धृत केले आहेत.याचं शीर्षक 'आलं तर आलं तुफान' असं आहे. या कवितेतून सुप्रिया सुळे यांनी सध्याच्या राजकीय स्थितीत एकप्रकारे लढण्याचा इरादा पक्का केल्याचा संदेश दिला आहे.

ट्वीटद्वारे शेअर केले विचार"आलं तर आलं तुफान"तुफानाला घाबरुन काय करायचं
तुफानाला तोंड द्यायला शिकलं पाहिजे
तुफानापासून पळून जाणाऱ्या
माणसाच्या हातून काही घडत नाही.
तुफानाला तोंड देण्याची
जी शक्ती आणि इच्छा आहे
त्यातनं तो काहीतरी करू शकतो
आणि घडवू शकतो

[tv9marathi]आलं तर आलं तुफान…
[ tv9 marathi]तुमच्यापेक्षा पोरी परवडल्या