[Sarkarnama]मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी फोटो पूर्वीच पाहिले,तरी..?
सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
बीड मधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फोटो वायरल झाल्यानंतर सबंध महाराष्ट्र हळहळा आहे. या नंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेले धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच ट्विट करत वैद्यकीय कारणासाठी राजीनामा दिला असल्याचं स्पष्ट केला आहे. त्यानंतर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या ट्विटवर विरोधक टीका करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील याबाबत आपले प्रतिक्रिया दिली आहे..
सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मंगळवारी (ता.4) पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर थेट भाष्य केलं. त्या सुप्रिया सुळे म्हणाल्या, राजीनामा दिल्यानंतर आमदार धनंजय मुंडे यांनी एक ट्विट केला आहे. यामध्ये ते वैद्यकीय करण्यासाठी राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ हे मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिल्याचं म्हणत आहेत. पण धनंजय मुंडेंच्या ट्विट मध्ये कुठेही नैतिकतेमधील न चा ही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे एकीकडे नैतिकतेवर राजीनामा दिल्याचं म्हटलं जातंय अन दुसरीकडे वैद्यकीय कारण मुंडेंनी दिलंय. यात मोठा विरोधाभास असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या ,संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये जी चार्जशीट बाहेर आली. त्यातील फोटो जे सध्या व्हायरल होत आहेत. ते फोटो यापूर्वीच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पाहिले असतील ना? मग राजीनामा घ्यायला एवढा काळ का लागला असा सवाल सुप्रिया सुळे यांनी सरकारला केला. .आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या हत्या प्रकरणातील सिडीआर समोर आणलेले आहेत. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचा संवाद हत्येच्या अर्धा तासांमध्ये झालाय, याचा अर्थ काय काढायचा आम्ही? असा सवाल करत सरकारने 84 दिवस याकडे कानाडोळा केला. अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
धनंजय मुंडे आणि नैतिकता याचा दुरान्वये संबंध येत नाही. ते आज मुंडे त्यांच्या ट्विटवरून स्पष्ट होत आहे. नैतिकता की वैद्यकीय कारणानं राजीनामा दिला, आधी स्पष्ट करणं आवश्यक असल्याचा देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच ही माणसं नाही तर हैैवान आहेत. फोटो पाहून राज्य हळहळतोय. बीड हे सुसंस्कृत शहर आहे. तिथं हे हैवान आहेत. संतोष देशमुखांच्या हत्येत ज्या कोणाचा हात असेल त्या प्रत्येकाला चौकात फाशी द्यायला हवी, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या..तसेच दिल्लीत जाऊन मी आणि खासदार बजरंग सोनवणे लवकरचं अमित शाह यांना भेटणार आहे. आत्तापर्यंत जे घडलं ते शाह यांच्या कानावर घालणार असल्याचा सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
