3 minutes reading time (529 words)

[TV9 Marathi]OSD आणि PA ना एक आणि मंत्र्यांना वेगळा नियम का? सुप्रिया सुळे यांचा सवाल ?

OSD आणि PA ना एक आणि मत्र्यांना वेगळा नियम का? सुप्रिया सुळे यांचा सवाल ?

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर या प्रकरणात कोर्टात आरोपपत्र दाखल झाले आहे.या आरोपपत्रात संतोष देशमुख यांना कशा प्रकारे हालहाल करुन मारले याचा पुरावे आरोपपत्रात सादर करण्यात आले आहेत. यात ८ व्हिडीओ आणि १५ फोटोंचा समावेश आहे. या फोटोतून या हत्याकांडाची दाहकता संपूर्ण देशाच्या नजरेत आल्यानंतर संतापाचा उद्रेक झाला आहे. यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिकता आणि आजारपणाचं कारण देत मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. वाल्मिक कराडचे पीए धनंजय मुंडे यांना भेटायला गेले आहेत. यावरून कळत त्यांचे किती घट्ट नाते आहे. त्यामुळे मुंडेंना सह आरोपी करा अशी आमची मागणी आहे अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

बीडमध्ये आतापर्यंत जे खून झालेत त्यांच्या फाईल्स उघडायाला पाहीजेत हे मी कालच सांगितल्याचे सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले. त्यापुढे म्हणाल्या की धनंजय मुंडे यांनी जे वक्तव्य केलंय त्याचा मी कालच जाहीर निषेध केला आहे. धनंजय मुंडे यांना नैतिकतेचा 'न' पण वापरलेला नाही. त्यांच्या पक्षात काय चाललंय हे त्यांनाच माहीत. सुरेश धस याचे स्टेटमेंट आहे की नैतिकता आणि धनंजय मुंडे यांची भेटच नाही झाली हे दुर्दैव आहे. वाल्मिक कराडचे pa धनंजय मुंडे यांना भेटायला गेले. यावरून कळतं किती घट्ट नाते आहे.त्यांना या केसमध्ये सह आरोपी करा अशी आमची मागणी आहे असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पुरंदरमध्ये जिल्ह्यातील पहिला टँकर सुरू झाला आहे. पुरेसा पाणीसाठा आहे असे सरकारने सांगितले आहे. प्रशासनाने व्यवस्थित पाणी वाटप करावे अशी आमची मागणी आहे. मी स्वत: बारामती लोकसभेचा रिव्ह्यू घेतला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पाणीच्या बाबतीत सेफ आहे असे सांगितले जात आहे. पुणे महापालिकेत विविध 113 पदाच्यांसाठी 27 हजार मुलांनी अर्ज केले आहेत. पैसे भरून घेतले आहेत तरी जागा का भरल्या जात नाहीत हा प्रश्न मी विचारणार आहे. नाहीतर आंदोलन करावं लागेल असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यावेळी सांगितले.

पंकजा मुंडे यांनी संतोष देशमुख कुटुंबाची माफी मागितली आहे. त्यांनी सुसंस्कृतपणा दाखवला आहे.खंडणी झाली, खून, हिंसाचार, शेतकरी यांची फसवणूक अजून काही राहिले का? कुठला गुन्हा राहिला आहे. ज्यावेळी हा प्रकार झाला त्याला vip ट्रीटमेंट झाली. या लोकांमुळे महाराष्ट्र बदनाम होतोय असे सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. जयकुमार गोरे यांची जी बातमी सोशल मीडियावर आली आहे. मला त्याची माहिती काढू देत. ज्या काही गोष्टी आल्यात त्या भयंकर आहेत.


विश्वासाने लोकांनी सत्ता दिली. पण यांनी कुठलाच गुन्हा सोडला नाही. 84 दिवस झाले राजीनामा यायला. संतोष देशमुख हत्येचे हे व्हिडीओ मधले फोटो आहेत.हे फोटो पाहूनत्यांच्या कुटुंबातील लोकांना काय वाटत असेल असा सवाल देखील सुळे यांनी केला. कोकाटे यांच्या गुन्हा दाखल झाला तरी त्यांना मंत्री मंडळातून काढले नव्हते. Osd आणि pa ला एक नियम आणि मत्र्यांना दुसरा नियम का? स्वतः नैतिकता पाळणे महत्त्वाची असते. मुख्यमंत्री देवगिरीला गेले आणि मग राजीनामा घेतला, हा राजीनामा आधीच घ्यायला पाहिजे होता. कृषी मंत्र्यांना शिक्षा झालेली मोठी आहे. कोकाटे यांच्या शिक्षेला कोणत्या ग्राऊंडवर स्थगिती लावली हे पाहावं लागेल. अबू आझमींबद्दलकाल आम्ही मागणी केली होती. त्यानुसार आज निर्णय झाला आहे असेही राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

...

OSD आणि PA ना एक आणि मत्र्यांना वेगळा नियम का? सुप्रिया सुळे यांचा सवाल ? - Marathi News | Why are there one rule for OSD and PA and different rules for ministers? Question from Supriya Sule? | TV9 Marathi

कोकाटे यांच्या शिक्षेला कोणत्या ग्राऊंडवर स्थगिती लावली हे बघावं लागेल. अबू आझमींबद्दलकाल आम्ही मागणी केली होती. त्यानुसार आज निर्णय झाला आहे असेही राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
[Sarkarnama]मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी फोटो प...
[Lokmat]मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांनी दिलं...