2 minutes reading time (368 words)

[ABP MAJHA]सुप्रिया सुळेंनी चांदणी चौकातील पुलासाठी सुचवलं 'हे' नाव

सुप्रिया सुळेंनी चांदणी चौकातील पुलासाठी सुचवलं 'हे' नाव

Pune Supriya sule :पुण्यातील चांदणी चौकातील प्रकल्पाचं काम जोमात सुरु आहे. येत्या काळात या उड्डाणपुलाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. या पुलासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी नाव सुचवलं आहे. थोर स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट यांनी 1921 साली शेतकरी आणि भूमीपुत्रांच्या संघर्षाची पहिली मोठी नोंद असणारा 'मुळशी सत्याग्रह' केला. सेनापती बापट यांच्या स्मरणार्थ चांदणी चौक येथील उड्डाण पुलास त्यांचे नाव द्यावे, अशी मागणी त्यांनी केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. ट्वीट करत त्यांनी ही मागणी केली आह


सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्य़े काय लिहिलंय?

पुणे शहरातील चांदणी चौक येथे राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरु आहे. या परिसरातील वाहतूक कोंडी व अपघात यावर उपाययोजना करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि केंद्र शासनाकडे यापुर्वी सातत्याने पाठपुरावा सुरु होता. यावर चांदणी चौकात पुलाचे काम नव्याने करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानुसार काम देखील सुरु आहे. आता हे काम अंतिम टप्प्यात आहे. हा पूल मुळशी तालुका, पुणे शहर आणि परिसराच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. यासोबतच तो पुणे-सातारा-बंगळुरू महामार्गावरील एक महत्वाचे ठिकाण असणार आहे.

ऐतिहासिक महत्व

मुळशी तालुक्यास ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. याच तालुक्यात थोर स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट यांनी 1921 साली शेतकरी आणि भूमीपुत्रांच्या संघर्षाची पहिली मोठी नोंद असणारा 'मुळशी सत्याग्रह' केला. या सत्याग्रहाला नुकतीच शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनांपैकी हे एक महत्त्वाचे आंदोलन अशी त्याची नोंद आहे. यानिमित्ताने या सत्याग्रहाचे नायक सेनापती बापट यांच्या स्मरणार्थ चांदणी चौक येथील उड्डाण पुलास त्यांचे नाव देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करता येणे शक्य आहे. यासाठी केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना विनंती आहे की कृपया आपण यासंदर्भात सकारात्मक विचार करुन यासंदर्भात निर्णय घ्यावा, असं सुप्रिया सुळे यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे. चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. येत्या दो महिन्यात हे काम पूर्ण होईल, असं सांगण्यात आलं आहे. या मार्गावरील काही पुल सुरु करण्यात आले आहेत. 1 मे रोजी या पुलाचं उद्घाटन करण्यात येणार होतं. मात्र पुलाचं काम अपूरं असल्याने उद्घाटनाला विलंब होणार आहे. 

...

Name Bridge At Chandni Chowk After Senapati Bapat Demands MP Supriya Sule | Pune Supriya Sule : सुप्रिया सुळेंनी चांदणी चौकातील पुलासाठी सुचवलं 'हे' नाव

पुण्यातील चांदणी चौकातील प्रकल्पाचं काम जोमात सुरु आहे. येत्या काळात या उड्डाणपुलाचं उद्घाटन करण्यात येणार आहे, या पुलासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी नाव सूचवलं आहे.
[punekarnews]MP Supriya Sule Urges Pune Municipal ...
[loksatta]चांदणी चौकातील पुलाला सेनापती बापट यांचे...