2 minutes reading time (457 words)

[ABP Majha]देशातील एवढ्या मोठ्या घराण्याचं नाव ज्या रुग्णालयाला देण्यात आलं तिथे एवढी मोठी घटना, अतिशय दुर्दैवी

देशातील एवढ्या मोठ्या घराण्याचं नाव ज्या रुग्णालयाला देण्यात आलं तिथे एवढी मोठी घटना, अतिशय दुर्दैवी

सुप्रिया सुळे यांचा घणाघात

Pune News : देशातील एवढ्या मोठ्या घराण्याचं नाव या रुग्णालयाला देण्यात आला असताना एवढी मोठी दुर्दैवी दुर्घटना होते, हे अतिशय धक्कादायक आणि संतापजनक असल्याची टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे. मंगेशकर कुटुंबियांचे योगदान हे केवळ देशात नव्हे तर जगभरात आहे. त्यामुळे जी भावना लोकांची आहे त्याची चर्चा झाली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. एकीकडे पीडित कुटुंबीयांचा आरोप आहे की आमची बदनामी करण्यात आली. या बाबत बोलताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या की, एखादे रुग्णालय इतक्या असंवेदनशीलपणे कसं काय वागू शकतं? रुग्णालय प्रशासनाने कितीही माफी मागितली तरी त्यांचा गुन्हा कमीच आहे. पीडित महिला ही कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी बहीण, पत्नी मुलगी आहे. त्यामुळे समाजात आणि रुग्णालय प्रशासनात काही माणुसकी उरली आहे की नाही? असा संतप्त सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

ज्या पद्धतीने पडीत महिलेला रुग्णालयाने वागणूक दिली, त्याचा करावा तितका निषेध थोडा आहे. त्यामुळे रुग्णालयावर कारवाई व्हायला पाहिजे, अशीही मागणी खासदार प्रिया सुळे यांनी केली आहे. हॉस्पिटल सेवा दिली पाहिजे, आम्ही लोक प्रतिनिधी हे तुम्हा नागरिकांचे सेवक आहोत. जगभरातील विद्वान डॉक्टर देशात आहेत. एक डॉक्टर वाईट वाजला म्हणून सरसकट सगळे डॉक्टर वाईट होत नाही. उत्तम डॉक्टरांचा देश म्हणून भारताकडे बघितलं जातं. आणि आपल्या कडे डॉक्टरला देव समजण्याची धारणा आहे, हे आपण कोरोना काळात प्रत्यक्ष अनुभवलं आहे. मात्र दीनानाथ रुग्णालयाबाबत कुठलेही राजकारण न आणता या संबंधित प्रशासनावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी ही खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून रुग्णालय प्रशासनाला फोन जातो आणि रुग्णालयाकडून त्यावर काहीही उत्तर मिळत नाही, हे धक्कादायक आहे. याबाबत दोन्ही बाजूंनी विचार केला पाहिजे. मुख्यमंत्र्याच्या कार्यालयाची यंत्रणा आणि रुग्णालय प्रशासनने तर यावर हमखास बोललं पाहजे. राज्यात कायदा आणि माणुसकी उरली आहे की नाही? घडलेली घटना अतिशय जास्त दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया ही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

माझ्या माहितीप्रमाणे, ही जागा आदरणीय शरद पवार साहेब यावेळी मुख्यमंत्री असताना आणि श्रीनिवास पाटील हे कलेक्टर असताना ही जागा देण्याबाबत प्रोसेस झाली. आणि लतादीदींच्या पुढाकाराने हे हॉस्पिटल उभारण्यात आलं. हा या रुग्णालयापाठचा इतिहास आहे. त्यानंतर अनेक वर्ष रुग्णांना तिथे उपचार मिळत आहेत. मधल्याकाळात काही तक्रारी येत होत्या, पण रुग्णालय म्हटल्यावर सामंजस्याची भूमिका घेण्यात आली. मात्र देशातील एवढ्या मोठ्या घराण्याचं नाव या रुग्णालयाला देण्यात आला असताना एवढी मोठी दुर्दैवी दुर्घटना होते, हे अतिशय धक्कादायक आणि संतापजनक असल्याची टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. 

...

deenanath mangeshkar hospital guilty Supriya Sule angry reaction on Tanisha Bhise Death Case marathi news maharashtra politics | देशातील एवढ्या मोठ्या घराण्याचं नाव ज्या रुग्णालयाला देण्यात आलं तिथे एवढी मोठी घटना, अतिशय दुर्दैवी; सुप्रिया सुळे यांचा घणाघात

Supriya Sule on Tanisha Bhise Death Case: देशातील एवढ्या मोठ्या घराण्याचं नाव ज्या रुग्णालयाला देण्यात आलं तिथे एवढी मोठी घटना घडते, हे अतिशय दुर्दैवी; असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
[Maharashtra Desha]“तनिषा भिसेंचा मृत्यू नव्हे तर ...
[ETV Bharat]तनिषा भिसे मृत्यू प्रकरण; दीनानाथ मंगे...