1 minute reading time (257 words)

[Maharashtra Desha]“तनिषा भिसेंचा मृत्यू नव्हे तर हत्या”

“तनिषा भिसेंचा मृत्यू नव्हे तर हत्या”

गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी Supriya Sule संतापल्या

Supriya Sule । पुण्यात तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मागच्या आठवड्यापासून चर्चेत आहे. पुण्यातील नामांकित रुग्णालय अशी ओळख असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर हलगर्जीपणाचा आरोप होतो आहे. या प्रकरणी शासकीय समितीच्या आधारे रूग्णालयाची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणास रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोप झाल्यानंतर रुग्णालयाने देखील एक चौकशी समिती नेमली. या समितीचा अहवाल समोर आला, त्यानंतर आज शासकीय समितीच्या अहवालाची देखील माहिती राज्य शासनाला आणि महिला आयोगाला देण्यात येत आहे.

चौकशी अहवालातून देखील रुग्णालयावरच ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानंतर आता डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा रुग्णालयाचे संचालक डॉ. धनंजय केळकर यांच्याकडे सुपूर्द केला. यावर आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पत्रकार परिषदेत बोलताना संताप व्यक्त केला आहे.

दीनानाथ रुग्णालयावर कारवाई झालीच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे. त्याचबरोबर तनिषा भिसे यांचा मृत्यू झालेला नसून हत्या करण्यात आली असल्याचं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. "डॉ. घैसास यांनी राजीनामा दिला म्हणजे काय झालं? आम्हाला राजीनामा नकोय. आम्हाला सरकारकडून तातडीने कारवाई हवी आहे", अशी मागणी त्यांनी केलीय.

"अहवालातून रुग्णालय प्रशासनाची चूक आहे, हे दिसत आहे. त्यामुळेच या प्रकरणात समावेश असलेल्या सर्वावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. एका समितीचा अहवाल आला आहे. सरकार आणखी दहा समित्यांचा अहवाल घेणार का?", असा संतप्त सवाल सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केलाय. 

[Loksatta]सुप्रिया सुळेंचा आरोप; “तनिषा भिसेंची हत...
[ABP Majha]देशातील एवढ्या मोठ्या घराण्याचं नाव ज्य...