1 minute reading time (95 words)

[Mumbai Tak]'अजित पवार आमचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादीमध्ये फूट नाहीच

'अजित पवार आमचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादीमध्ये फूट नाहीच

सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान

आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी मोदी सरकारला पराभूत करण्यासाठी देशभरातील विरोधी पक्ष एकवटलेले आहेत. देशभरातील विरोधी पक्षांनी 'इंडिया' आघाडीची स्थापनाही केली. आतापर्यंत इंडिया आघाडीची पाटणा आणि बंगरुळु येथे बैठकही पार पडली आहे. आता इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक येत्या ३० ऑगस्ट आणि १ सप्टेबरला मुंबईत होणार होणार आहे. पण या बैठकीच्या सहा दिवसआधी सुप्रिया सुळे यांनी मोठा बॉम्ब फोडत इंडिया आघाडीत खळबळ उडवून दिली. अजित पवारआणि राष्ट्रवादी पक्षाबाबत त्यांनी मोठे विधान केले आहे. राष्ट्रवादीत कुठलीही फूट पडलेली नाही, अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते आहेत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

[TV9 Marathi]'कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड ...
[ABP MAJHA]अजित पवार आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते-स...