1 minute reading time
(62 words)
[Mumbai Tak]सुप्रियाताईंचा जोरदार प्रश्न, लोकसभेत मुरलीधर मोहोळांचं खणखणीत उत्तर
लोकसभेत आज प्रश्नोत्तराच्या कालावधीत सहकारी साखर कारखान्याविषयी प्रश्न उपस्थित केला. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने घोडगंगा आणि राजगड सहकारी साखर कारखान्याला दिलेला निधी राज्य सरकारने वितरीत केलेला नाही. यामुळे निधीसाठी साखर कारखान्यांना न्यायालयात जावे लागते तर याबाबत सरकारची भूमिका काय आहे असा प्रश्न उपस्थित केला. सहकार राज्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत चाैकशी करुन निधी संबंधित साखर कारखान्यांना दिला जाईल, असे आश्वासन दिले.