1 minute reading time (293 words)

[news18marathi]'दादांचा अपमान करण्यासाठी तुम्ही..'

'दादांचा अपमान करण्यासाठी तुम्ही..'

पडळकरांच्या वक्तव्यावरुन सुप्रिया सुळेंचा भाजपला प्रश्न

नवी दिल्ली, 19 सप्टेंबर (प्रशांत रामदास प्रतिनिधी) : भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. या वक्तव्यानंतर अजित पवार गट आक्रमक झाला असून पडळकरांवर टीका केली जात आहे. या प्रकरणात आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया देत भाजपला सुनावलं आहे. संसदेत महिला आरक्षण पास झाल्यानंतर प्रतिक्रिया देत असताना त्या बोलत होत्या.

सुप्रिया सुळे यांनी भाजपला सुनावलं

भाजप नेते गोपिचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेलाही सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं आहे. दादा हे राज्याचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्याबद्दल दादांचा मित्रपक्ष अस बोलतो, हे दुर्देवी आहे. भाजपने दादांचा अपमान केला आहे. दादांचा अपमान करण्यासाठी तुम्ही अजित पवार यांना सोबत घेतलं का? असा प्रश्नही सुळे यांनी भाजपला विचारला आहे.

2029 लाच हे बिल लागू होईल : सुप्रिया सुळे

संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये महिला आरक्षण विधेयक पास झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुळे, म्हणाल्या, भावना मिक्स आहेत. पण राष्ट्रवादी म्हणून मी याचं स्वागत करते. पण हे विधेयक वाचल्यानंतर सविस्तर बोलेल. हे विधेयक 2029 लाच लागू होईल, अशी शक्यताही सुळे यांनी वर्तवली आहे. मला ही काळजी वाटते, याच वोटिंग व्हावं लागेल. भाजपने सगळ्या पक्षांशी बोलणं केलं आहे का हे माहीत नाही. राज्यसभेसाठी हे काय करणार आहेत हे स्पष्ट झालं नाही. श्रेयवाद नंतर होईल. आधी बिल तर पास होऊ द्या, अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली.

...

'दादांचा अपमान करण्यासाठी तुम्ही' पडळकरांच्या वक्तव्यावरुन सुळेंचा भाजपला प्रश्न – News18 मराठी

Supriya Sule : भाजप नेते गोपिचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
[ABP MAJHA]आमच्यासारख्या महिलांना आरक्षणाची गरज ना...
[ABP MAJHA]महिला आरक्षणाच्या निर्णयाचं स्वागत