1 minute reading time (107 words)

[LOKMAT]“तुम्हाला पक्ष पाहिजे, चिन्ह पाहिजे, घ्या…”

“तुम्हाला पक्ष पाहिजे, चिन्ह पाहिजे, घ्या…”

सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या? 

'जे ज्याच्या हक्काचे आहे ते त्याच्याकडे राहिले पाहिजे, ही माझी भूमिका आहे; परंतु आता पक्ष कोणाचा यावरून न्यायालय आणि आयोगापुढे कामकाज सुरू आहे. पक्ष हातातून गेला तरी आम्ही पुन्हा तयारी करू,' असे मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. बारामती तालुक्याच्या गावभेट दौर्‍यात त्या पत्रकारांशी बोलत होत्या. खा. सुळे म्हणाल्या, 'राष्ट्रवादीची स्थापना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. ते स्थापनेपासून अध्यक्ष आहेत. आजवर अध्यक्षपदावरून त्यांना कधीही हटवले गेलेले नाही. त्यामुळे पक्षाबाबत आता कोणी दावा करत असेल तर तो कितपत योग्य आहे? माझ्याकडे सत्ता किंवा संघर्ष असे दोन पर्याय होते. मी संघर्षाचा पर्याय निवडला.' असेही खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. 

[Maharashtra Times]सुप्रिया सुळे बारामती दौऱ्यावर,...
[TV9 Marathi]सुप्रिया सुळे यांची एकनाथ शिंदे यांच्...