1 minute reading time (100 words)

[News18 Lokmat] संविधान आणि संत सारखेच- बारामतीतील कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांचं प्रतिपादन

संविधान आणि संत सारखेच- बारामतीतील कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांचं प्रतिपादन

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी पूर्ण वारी करत नाही. मी हौशे नवशे त्यातील एक आहे. गेल्या 18 वर्षांपासून मी पालखीत चालते. यंदा दिवे घाटाची पालखी चुकली. पालखी हा राजकीय विषय नाही तर तो आमच्या आस्थेचा विषय आहे. पांडूरंग एकच असा देव आहे की जो म्हणतो माझ्याकडे येऊ नका, मी स्वतः दर्शन द्यायला येतो.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, संविधान आणि आपले संत यांचे विचार एकच आहेच. एका वर्षांपूर्वी असं वाटायचं आपला देश अंधश्रद्धाकडे निघाला आहे का? पण अयोध्येत पण भाजपचा पराभव झाला. मी श्रीराम म्हणत नाही तर मर्यादा पुरूषोत्तम राम म्हणते. चुकीच्या राईट विंगला हा लोकांनी राजकारणात रिजेक्ट केलं आहे. 

[Times Now Marathi]'मी श्रीराम म्हणत नाही तर...'
[Mumbai Tak] Ajit Pawar यांच्या काटेवाडीतील घरी Su...