1 minute reading time (116 words)

[ABP MAJHA]आमचे राजकीय मतभेद पण,लढाई वैचारिक आहे व्यक्तीगत नाही-सुप्रिया सुळे

आमचे राजकीय मतभेद पण,लढाई वैचारिक आहे व्यक्तीगत नाही-सुप्रिया सुळे

 राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बारामतीतील एका कार्यक्रमामध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकाच स्टेजवर दिसले. त्या आधी प्रतापराव पवारांच्या घरी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली होती. आता दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने सर्व पवार कुटुंबीय एकत्र येणार आहे. त्यामध्ये अजित पवार सहभागी होणार का असा प्रश्न विचारल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आमचे वैचारिक मतभेद आहेत, मनभेद नाहीत. जेव्हा आपले वय वाढते तेव्हा वैचारिक प्रगल्भता वाढली पाहिजे. आमची लढाई वैचारिक आहे व्यक्तिगत नाही. राजकीय मतभेद आहेत पण भाजपच्या अनेक नेत्यांशी आमचे संबंध आहेत. दादा कार्यक्रमात मास्क लाऊन बसले होते, त्यामुळे त्यांना भेटण्याची मुभा आहे का नाही हे डॉक्टर ठरवतील. तुम्हा सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद हे शरद पवारांचे टॉनिक आहे असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

[Zee 24 Taas]शरद पवार भाजपात जाणार? सुप्रिया सुळें...
[RNO Official]नाती एका जागेवर आहे आणि आमची राजकिय ...