1 minute reading time
(73 words)
[ABP MAJHA]डोक्यावर तुळस, वारकऱ्यांसह फुगडी
सुप्रिया सुळे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत
संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याने काल पुण्यातून अवघड असा दिवेघाट सर केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणी कार्याध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यादेखील या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्या.त्यांनी वारकऱ्यासोबत झेंडेवाडीपर्यंत पायी वारी केली.पालखी सोहळ्यादरम्यान, विसाव्याच्या ठिकाणी सुप्रिया सुळे माऊलींच्या चरणी नतमस्तक झाल्या. माऊली... यंदा चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळू दे' अस साकडं घातलं. वारीत सहभागी झालेल्या आलेल्या लहानथोर वारकऱ्यांशी आपुलकीने संवाद साधला.