2 minutes reading time (339 words)

[Loksatta]अमेरिकेतही सप्रिया सुळेंच्या लोकप्रियतेचा डंका

अमेरिकेतही सप्रिया सुळेंच्या लोकप्रियतेचा डंका

टाईम्स स्क्वेअरवर झळकला बाप-लेकीचा फोटो

लोकासभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामधील सर्वात हाय व्होल्टेज असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जनतेने परत एकदा सुप्रिया सुळे यांनाच पसंती दिली. बारामतीकरांची लेकीला पसंती राहिली हे दिसून आलं, कारण सुप्रिया सुळे यांनी तब्बल दीडा लाखांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला. बारामती लोकसभा मतदार संघामध्ये येणार सहा विधानसभा मतदारसंघांमधील आकडेवारी पाहिली तर पाच मतदारसंघात त्यांना लीड मिळालं आहे. यानंतर सगळीकडे सप्रिया सुळेंच्या विजयाचे बॅनर झळकल्याचं पाहायला मिळालं. मात्र आता साता समुद्रापार न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरमध्ये सुप्रिया सुळे यांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकले. सुप्रिया सुळे यांचे चाहते परीक्षित तळोकार यांनी या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.

न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरमध्ये सुप्रिया सुळे-शरद पवारांचे बॅनर्स पाहायला मिळाले. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचा फोटो या न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर लावला आहे. यावर अभिनंदन असं लिहलं आहे. सुप्रिया सुळेंच्या हे अभिनंदनाचे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यामुळे अमेरिकेतही सप्रिया सुळेंच्या लोकप्रियतेचा डंका पाहायला मिळाला.

दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे राहुल कुल आमदार आहेत. या मतदारसंघातूनही सुप्रिया सुळेंना २६,३३७ चं लीड मिळालं, इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे आमदार असून त्या ठिकाणीही सुप्रिया सुळेंना २५, ९५१ मतांच लीड, अजित पवार यांचा स्वत:चा मतदार संघ असलेल्या बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना सर्वाधिक ४७,३८१ मतांच लीड मिळालं. पुरंदरमध्ये काँग्रेसचे संजय जगताप आमदार असून त्या ठिकाणीही ३५ हजार मतांचं लीड, भोर तालुक्यातही सुप्रिया सुळे यांना दुसरं सर्वाधिक ४३,८०५ लीड मिळालं. भोरमध्ये काँग्रसचे संग्राम थोपटे आमदार आहेत. खडकवासला येथे सुप्रिया सुळे यांना फटका बसला, या ठिकाणी सुनेत्रा पवार यांना २०,७४६ मतांचं लीड मिळालं होतं. तर सुप्रिया सुळे यांना एकूण ७,३१,४०० तर सुनेत्रा पवार यांना एकूण ५,७३,३९१ मते मिळाली आहेत तर सुप्रिया सुळे एकूण १, ५८, ००९ लीडने निवडून आल्या. 

हा व्हिडीओ andparikshitspeaks नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. तर समर्थकही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

[Sakal]अमेरिकेतही पवारांची चर्चा!
[Lokmat]अमेरिकेच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकला सुप्रि...