2 minutes reading time (354 words)

[Lokmat]अमेरिकेच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकला सुप्रिया सुळे-शरद पवारांच्या अभिनंदनाचा बॅनर

अमेरिकेच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकला सुप्रिया सुळे-शरद पवारांच्या अभिनंदनाचा बॅनर

महाराष्ट्राच्या मातीतील काका-पुतण्या जोडीत रंगलेला सामना काकांच्या पारड्यात पडला. राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये रंगलेल्या द्वंद्वामध्ये बारामतीत शरद पवारांचा विजय झाला. शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी बारामतीत लोकसभा निवडणुकीत सुमारे दीड लाख मतांनी दादा गटाच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांना पराभूत केले. बारामती लोकसभा निवडणूक ही दोन्ही पवारांसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न होता. त्यात शरद पवार हे अजित पवारांवर वरचढ चढल्याचे दिसून आले. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर राज्यासह देशातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तशातच सातासमुद्रापार अमेरिकेतही त्यांच्या विजयाच्या शुभेच्छांचा बॅनर झळकला. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

सुप्रिया सुळे यांनी १ लाख ५८ हजार ३३३ मतांच्या फरकाने सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. सुळे यांच्या विजयानंतर न्यूयॉर्कमधील टाईम्स स्क्वेअरवर त्यांचे अभिनंदन करणारा मोठा बॅनर लावण्यात आला. बॅनरचा व्हिडिओ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने ट्विटरवर पोस्ट केला आहे. तो पक्षाच्या इन्स्टाग्राम हँडलवर रिपोस्ट करण्यात आला आहे. त्याला मराठी कॅप्शन दिले आहे. \"साता समुद्रापार न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरमध्ये झळकले सुप्रियाताई सुळे यांच्या अभिनंदनाचे बॅनर, ताईंचे चाहते @ptalokar9 (परिक्षित तळोकर) यांनी या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत,\" असे कॅप्शन त्या व्हिडीओला देण्यात आले आहे.

विजयानंतर पत्रकारांशी बोलताना सुळे यांनी आपल्या मतदारसंघातील जनतेचे आभार मानले. \"मी बारामतीच्या जनतेची आभारी आहे. विजयानंतर आपल्या सामूहिक जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. गेलेले विसरून जा. निवडणुकीदरम्यान जे काही घडले ते महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणारे नाही आणि आगामी राज्याच्या निवडणुकीत ते टाळले पाहिजे. त्यासाठी आपण अत्यंत सावधगिरी बाळगूया," असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

...

अमेरिकेच्या 'टाइम्स स्क्वेअर'वर झळकला सुप्रिया सुळे-शरद पवारांच्या अभिनंदनाचा बॅनर, (VIDEO) - Marathi News | Sharad Pawar Supriya Sule Baramati Lok Sabha Victory Celebrated In New York Times Square WATCH VIDEO | Latest maharashtra News at Lokmat.com

Sharad Pawar Supriya Sule Baramati Lok Sabha Victory Celebrated In New York Times Square WATCH VIDEO. Sharad Pawar Supriya Sule, Baramati Lok Sabha Election Result 2024: पवार विरूद्ध पवार लढतीत सुप्रिया सुळेंचा झाला विजय, सुनेत्रा अजित पवारांचा दीड लाखांनी केला पराभव - Latest Marathi News (मराठी बातम्या). Find Breaking Headlines, Current and Latest maharashtra news in Marathi at Lokmat.com
[Loksatta]अमेरिकेतही सप्रिया सुळेंच्या लोकप्रियतेच...
[Loksatta]पवार विरुद्ध पवार लढतीत सुप्रिया सुळेंचा...