1 minute reading time (114 words)

[TV9 Marathi]मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारला व्यवस्थित हाताळता आला नाही - सुप्रिया सुळे

maxresdefault-53

आरक्षणाचा मुद्दा अतिशय संवेदनशील आहे. त्या मुद्द्यावर राज्य सरकारने स्वतंत्र खास अधिवेशन बोलविण्याची गरज आहे. त्यात आम्ही ताकदीने मत मांडूच. कारण आम्ही त्याला पाठिंबा देत आहोत, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. राज्य सरकारने मराठा, धनगर, मुस्लिमसह लिंगायत समाजाच्या मागण्यांकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.मराठा आरक्षणाचा प्रश्न व्यवस्थित हाताळण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे, असे स्पष्टपणे नमूद करून सुळे म्हणाल्या, ''मराठा, धनगर, लिंगायत व मुस्लिम समाज यांना आरक्षण देऊ किंवा त्यांच्याशी चर्चा करू म्हणत दहा वर्षे झुलवले आहे. त्यामुळे तो पक्ष भ्रष्ट जुमला पार्टी झाला आहे. तो पक्ष जुन्या लोकांनी चालवला. त्यांनी तो भाजप म्हणून राखला. मात्र, आता केवळ भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे अनेक प्रश्न सुटलेले नाहीत.''

गृहमंत्र्यांच्या कामाचा दर्ज का घसरतोय?अटलजींच्या ...
[Saam TV]"राज्यात 200 आमदारांचे सरकार तरी.."-सुळे