2 minutes reading time (434 words)

[tv9marathi]सुप्रिया सुळे यांचा भर कार्यक्रमात गौप्यस्फोट

सुप्रिया सुळे यांचा भर कार्यक्रमात गौप्यस्फोट

अजित पवार गटाचा वकील सदानंद सुळे यांचा वर्गमित्र?

सातारा | 19 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची साताऱ्यात आज जाहीर सभा झाली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटावर टीका केली. यासोबतच त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी जाहीर कार्यक्रमात मिश्किल पद्धतीत एक गौप्यस्फोट केला. अजित पवार यांच्या गटाची बाजू सुप्रीम कोर्टात खंबीरपणे मांडणारा एक वकील हे सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांचे वर्गमित्र आहेत, असा गौप्यस्फोट सुप्रिया सुळे यांनी केला. यावेळी त्यांनी मिश्किल पद्धतीने अजित पवार गटावर निशाणा साधला.

"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जे सोडून गेले त्यांच्याविरोधात काहीही बोलणार नाही. याचं कारण असंय की, ते जे कृती करत आहेत ती त्यांची कृती नाहीच. ही जी अदृश्य, दिल्लीची महाशक्ती आहे, ती महाशक्ती आणि अदृश्य शक्ती ही महाराष्ट्राच्या विरोधात कटकारस्थान रचत आहे. अदृश्य शक्तीने शिवसेनेची काय अवस्था केली ते आपल्या सर्वांना माहिती आहे. माझ्यासाठी एकच शिवसेना आहे आणि त्याचे अध्यक्ष उद्धव ठाकरेच आहेत. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आहे", असं सु्प्रिया सुळे म्हणाल्या.

'त्यांना माझ्या नवऱ्याचा वर्गमित्रच वकील म्हणून मिळाला'

 "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गट वेगळा झालाय. आता लढाई सुप्रीम कोर्टात सुरु आहे. खूप मजा येत आहे. मी कधी सुप्रीम कोर्टात गेली नव्हती. या निमित्ताने जायला मिळालं, नवीन काहीतरी शिकायला मिळालं. गंमतीची भाग म्हणजे समोरचा त्यांच्या बाजूचा वकील हा सदानंद सुळे यांचा वर्गमित्र निघाला. तुम्हाला एवढ्या मोठ्या देशात दुसरा वकील मिळाला नाही? एवढ्या मोठ्या देशात वकील मिळू नये? तो माझ्या नवऱ्याचा वर्गमित्रच मिळाला. पण आपलं काही सेटिंगबेटिंग नाही. मी त्याला म्हटलं बाबा रे तू तुझं क्लाईंटचं काम कर. कोर्टमध्ये आपण ताकदीने लढू. संध्याकाळी तू आणि सदानंद काय टाईमपास करायचा तो करा", असं सुप्रिया सुळे मिश्किलपणे म्हणाल्या.

"निवडणूक आयोगाच्या सुनावणीला शरद पवार स्वत: गेले होते. मला गंमत अशी वाटली, ज्यांना पक्ष हवाय त्यांचं कोणीच नव्हतं. ज्यांनी पक्षाला जन्म दिला तो तिथे मात्र पाच तास बसून होता. लक्षात ठेवा मी एक आई आहे. दहा मुलं रडली तरी आपल्या मुलाचा सूर आईला माहिती असतो. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवारांचं नातं आहे. कुणीही काहीही काढू द्या किंवा अदृश्य शक्ती येऊद्या. त्याचा मायबाप एकच आहे, त्याचं नाव शरद पवार आहे", असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

...

Supriya Sule यांचा भर कार्यक्रमात गौप्यस्फोट, अजित पवार गटाचा वकील सदानंद सुळे यांचा वर्गमित्र? - Marathi News | Mp supriya sule claim that ajit pawar group lawyer is friend of her husband sadanand sule | TV9 Marathi

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटाची आता केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात कायदेशीर लढाई सुरु आहे. या लढाईदरम्यान सुप्रिया सुळे यांनी साताऱ्यात जाहीर कार्यक्रमात एक गौप्यस्फोट केलाय. या गौप्यस्फोटावर त्यांनी आपली सविस्तर भूमिका देखील मांडलीय.
[abplive]माझी लढाई फक्त भाजपाविरोधात आहे
[ABP MAJHA ]ट्रीपल इंजिनला मराठा आरक्षणाबद्दल काही...