2 minutes reading time (363 words)

[mymahanagar]आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे – सुप्रिया सुळे

आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे – सुप्रिया सुळे

मुंबई : राज्यभरात अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा राज्यात पाऊस कमी झाल्यामुळे नोव्हेंबर महिन्यात 40 तालुक्यात सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. या अवकाळी पाऊसामुळे खरीप हंगामातील शिल्लक राहिलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू. लोकसभेत शेतकऱ्यांचा मुद्दा मांडणार, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळेंनी दिले आहे.

अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसानसंदर्भात सुप्रिया सुळे म्हणाल्या, "लोकसभेत शेतकऱ्यांचा मुद्दा मांडणार आहे. आमचे सगळे पदाधिकारी सर्व राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्याला आणि काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहली. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी", अशी मागणी सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारकडे केली आहे.

छगन भुजबळांना काही मते मांडायची असतील तर ते राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत. छगन भुजबळांनी बाहेरच्या व्यासपीठावर न बोलता कॅबिनेटमध्ये त्यांनी त्यांचे मुद्दे मांडावे, अशी भूमिका सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलेली आहे. सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, "राज्यात सत्तेत असलेले लोक सभामध्ये मत मांडत आहेत. यातच ट्रिपल इंजिन खोके सरकारमध्ये किती गोंधळ आहे. जर कॅबिनेटमध्ये बाहेर येऊन मागण्या करत असतील, तर मग कॅबिनेटमध्ये कसली चर्चा होते. ही खूप चिंताजनक परिस्थिती आहे. यात सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे, हे दुर्दैवी. आता जे राज्यात नुकसान होत आहे ते ट्रिपल इंजन खोके स्वार्थी सरकारमुळे होत आहे."

दीपक केसरकरांनी एका कार्यक्रमादरम्यान शिक्षक भरतीसंदर्भात प्रश्न विचारल्यावर त्यांनी शिक्षिकेला झापले, या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, "हे दुर्दैवी, एका शिक्षिकेचा अपमान या शाहू-फुले-अंबेडकर-छत्रपतींच्या राज्यात होत असेल, तर दुर्दैवाने मला या खोके सरकारबद्दल बोलावी लागेल. या सरकारला सत्तेची आणि पैशाची मस्ती आली आहे. शिक्षिकेचा जर तुम्ही आपमान करणार असाल, तर पक्ष सोड पण महाराष्ट्रपण कधी सहन करणार नाही. कोणत्याही शिक्षक-शिक्षिकेचा आपमान कोणतेही सरकार करत असेल, तर त्या शिक्षिकेच्या मागे आम्ही ताकदीने उभे राहू. ती एक महिला होती. त्यामुळे भ्रष्टजुमला पार्टी सातत्याने महिलांचा अपमान करते आणि त्यांच्या मंत्री पक्षाना देखील हे गुण लागले आहेत. यामुळे एका महिलेचा अपमान आम्ही सहन करणार नाही. या सरकारला पैसे, सत्ता आणि कंत्राटची मस्ती आली ना हे महाराष्ट्राच्या मायीबाप सुसंस्कृत जनतेला माहिती आहे.

...

We stand with the farmers with full strength - Supriya Sule ag

मुंबई : राज्यभरात अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा राज्यात पाऊस कमी झाल्यामुळे नोव्हेंबर महिन्यात 40 तालुक्यात सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. या अवकाळी पाऊसामुळे खरीप हंगामातील शिल्लक राहिलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. …
[tv9marathi]सुप्रिया सुळे यांचा छगन भुजबळ यांना सल...
[oksatta]‘खोके सरकार’ म्हणत सुप्रिया सुळेंची शिंदे...