1 minute reading time (111 words)

[News18 Lokmat]पावसानंतर सुप्रिया सुळे पुणे दौऱ्यावर

पावसानंतर सुप्रिया सुळे पुणे दौऱ्यावर

पुणे शहराचा मागील काही वर्षांत झपाट्याने झालेला विस्तार, यात जागा बळकावण्याच्या हव्यासापोटी नैसर्गिक ओढे-नाल्यांवर केलेले अतिक्रमण, त्याकडे प्रशासनाचे झालेले दुर्लक्ष, सिमेंट रस्त्याचे वाढलेले जाळे अन् तुंबलेली गटारे यासह विविध कारणांमुळे पुण्याची तुंबई झाली. स्मार्ट सिटीचे वाभाडे निघाले आणि 'विकास' पाण्यात वाहून गेला, अशा शब्दांत पुणेकर तीव्र संताप व्यक्त केला आहे. शनिवारी शिवाजीनगर, जंगली महाराज रस्ता, एरंडवणा, कोथरूड, कर्वेनगर, हडपसर, लोहगाव, धानोरी, सिंहगड रोड परिसर, वारजेसह शहराच्या विविध भागांत नागरिकांची तारांबळ उडवली होती. याभागात खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेणे व पुणे महानगर पालिकेस त्यादृष्टीने उपाय योजना करण्यास सुचवण्यासाठी आज दौरा केला. यावेळी त्यांनी शनिवारी झालेल्या मुसळधार पावसासंदर्भांत नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.  

[Saam TV]वर्धापन दिनानिमित्त सुप्रिया सुळेंचं दणदण...
[Lokmat]पक्ष फोडायला अन् सत्तेचे नंबर वाढवायला त्य...