1 minute reading time (293 words)

[saamtv]मराठा समाजाच्या मनातील प्रश्न सुप्रिया सुळेंनी सरकारला विचारला? फडणवीसांवरही निशाणा

मराठा समाजाच्या मनातील प्रश्न सुप्रिया सुळेंनी सरकारला विचारला? फडणवीसांवरही निशाणा

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सरकारने दिलेली २४ ऑक्टोबरची डेडलाईन संपल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला. मागील काही दिवसांपासून राज्यभर मराठा समाजाची ठिकाणी आंदोलने सुरु आहेत. मात्र आज मराठा आंदोलकांचा संयम सुटला आणि त्यांनी हिंसक मार्ग पत्करला.

बीडमध्ये मराठा आंदोलकांनी आमदार प्रकाश सोळंके यांच्या कार जाळल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. गृहखात्याचं हे अपयश असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रिपदाची राजीनामा द्यावा, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याखाली उभ्या असलेल्या कार पेटवल्या. कार पेटल्यानंतर उडालेल्या भडक्याची झळ त्यांच्या बंगल्यालाही लागली. आंदोलक इथवरच न थांबता बंगल्यात घुसून त्यांनी तोडफोडही केली.


गृहमंत्र्यांनी झेपत नसेल तर राजीनामा द्यावा

यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आमदाराच्या घरावर झालेला हल्ला हे सरकारचं इंटेलिजन्स फेल्युर आहे. आमदारांच्या घरात लोक शिरतात. गाड्या पेटवतात, तोडफोड करतात. महाराष्ट्राला पॉलिसी पॅरालीसिस झाला आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठा आरक्षण प्रकरणात ४० दिवस सरकार काय करत होते. ट्रिपल इंजिन सरकारने ४० दिवस काय केले. सरकारने ४० दिवसाचं आश्वासन कशाच्या जोरावर दिलं हे आधी सांगावं, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. ४० दिवस घेऊन सुद्धा काही केले नाही. ही मनोज जरांगे पाटील यांची फसवणूक नाही का? मराठा समाजाची फसवणूक नाही का? असा संतप्त सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

[lokmat]"सत्यमेव जयते... सर्वोच्च न्यायालयाच्या नि...
[TV9 Marathi]मनीषा कायंदे यांनी केलेल्या आरोपांनंत...